चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा’ पुरस्कार

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा’ पुरस्कार

मराठी राजभाषा दिनानिमित्त ॲग्रोवन न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण आयोजित धर्मवीर छन्त्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन – २०२४ (वर्ष ७ वे) तर्फ यंदाच्या ॲग्रोवन न्यूज परिवार फलटण 2023 चे साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आलेत.

वैचारिक लेख संग्रह बोल हे अंतरीचे” लेखक दिनेश चव्हाण यांना राज्यस्तरीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा’ पुरस्कार घोषित करण्यात आला.

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला राज्यस्तरीय 'साहित्य सेवा' पुरस्कार 3
वैचारिक लेख संग्रह बोल हे अंतरीचे

पुरस्कार वितरण प.पू. तपोनिधी शिवयोगी श्री नंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते फलटण, जि.सातारा येथे मंगळवार दि. २७/०२/२०२४ रोजी  होणार आहे.

पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविले जाईल

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला राज्यस्तरीय 'साहित्य सेवा' पुरस्कार 5
ॲग्रोवन न्यूज परिवार फलटण 2023 चे साहित्य पुरस्कार घोषित

दिनेश चव्हाण हे खानदेशातील अष्टपैलू व्यक्तिमत्व

खान्देश कला रत्न चित्रकार कवी दिनेश चव्हाण हे खानदेशातील अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत.चित्रकला,साहित्य,कवी अशा अनेक भुमीकेतुन सेवा प्रदान करुन त्यांनी खान्देशच नावलौकिक वाढवलेलं आहे. नुकतंच त्यांना दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवार्ड ने सन्मानित करण्यात आलं आहे. 97 मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे त्यांच्या चित्रकला चा सन्मान म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे.

दिनेश चव्हाण हे खानदेशातील नावाजलेले फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट आहेत. आज पर्यंत शेकडो बातमीपत्रात आणी मासिकांमध्ये त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून छान असे स्केच दिलेले आहेत. सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आणि आगामी सातवे अहिराणी साहित्य संमेलन चे बोधचिन्ह दिनेश चव्हाण यांनीच त्यांच्या चित्रकलेतून साकार केलं आहे.

1 thought on “चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा’ पुरस्कार”

Leave a Comment