खान्देश वाहिनी
खान्देशातील ऐकमेव प्रसारण संस्था
खान्देशची आपली हक्काची प्रादेशिक वाहीनी TV चैनल असाव म्हणून प्रत्येक खान्देशी व्यक्ती स्वप्न पाहतो पण काही कारणाने संध्या आपल्या खान्देशची स्वताची वाहीनी/TV चैनल नाही.
खान्देश वाहिनी सुरु करण्या साठी आपण काम सुरु केले आहे आणी येत्या दोन तीन वर्षेपर्यंत हे स्वप्न साकार होईल याची खात्री आहे.
ग्रुपमध्ये प्रत्येकाला हाच प्रश्न पडला असेल की करोड़ो रुपये खर्च लागणारी वाहीनी कशी सुरु होईल आणी खान्देशी वाहिनी सुरु झाल्यावर कशी चालेल?
मित्रानो ईच्छा असेल तरच मार्ग निघतो
There is Will There is Way
खान्देशी वाहिनी सुरु करण्यासाठी पाच कोटी ते वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, मग हा पैसा कसा काय आणता येईल? हाच मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल,मित्रानो मी तुम्हाला खान्देशी वाहिनी कशी सुरु करता येईल यांचा आराखडा सांगतो.
प्रत्येक मोठी गोष्ट साध्य करणाऱ्या साठी एक स्वप्न उराशी बाळगाव लागते आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू करावी लागते,
आपण खान्देशी वाहिनी सुरु करण्याच स्वप्न पाहिले आहे त्यासाठी आपला आराखडा खालील प्रमाणे
पहीला ठप्पा सगळे खान्देशी साहित्यीक आणि कलावंत ऐकाच प्लेटफार्म वर येणे आवश्यक आहे आणी त्या अनुषंगाने खान्देशी वाहिनी हा ग्रुप सुरू केला गेला आहे, ऐकाच ग्रुपमध्ये असल्याने आपली ऐक साखळी तयार होईल ज्यामुळे या श्रेत्रातील सगळे मंडळी ऐकमेकाची मदद करु शकतील Developing Eco System for mutual aid
दुसरा टप्पा खान्देशी वाहिनीची लहान सुरवात करावी लागेल त्यासाठी Android आप्लीकेशनची सुरवात करावी लागणार आहे. आप्लीकेशनचा फायदा असा होईल की आपण आपली श्रमात जाणु शकतो की; आपण कीती कन्टेन आप्लीकेशनच मध्ये टाकु शकतो आणी कन्टेन प्रेक्षकांना दाखवून कीती पैसा कमऊ शकतो आणि आप्लीकेशनला कन्टेन देणार्या निर्मात्यांना कीती पैसा देऊ शकतो.
Monetization of Content in Application
तीसरा टप्पा खान्देशी वाहिनी आप्लीकेशन प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाले की आप्लीकेशन मध्ये लाईव्ह वाहीनी Live TV 24×7 सुरु करायचे आणी एक-दोन वर्षे लाईव्ह कार्यक्रम 24 घंटे 365 दिवस चालवायचा यामुळे आपण 24 घंटे वाहीनी चालऊ शकतो याचा अनुभव आपल्याला येईल. Live 24×7 TV in Application
चौथा टप्प्या मित्रानो हाच टप्प्या आहे जेव्हा आणि खान्देशी वाहिनी सुरु करण्यासाठी प्रशासकीय कामाला सुरुवात करणार, या टप्प्यात आपण भारतीय माहीती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून वाहीनी सुरु करण्यासाठी आवेदन देऊ आणी आपली पुर्ण कल्पना माहीती तंत्रज्ञान मंत्रालयाला आवडल्यास आपली वाहीनी सुरु करण्यासाठी परवाना मिळऊ.
TV channel Licence procedures
पाचवा टप्प्या खान्देशी वाहिनी साठी पाच कोटी ते वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,हा पैसा आपण मेड़िया कंपनी स्थापन करुन उभा करू,कंपनी स्थापन झाली की मोठे आणी छोटे गुणवंतणुकदार आपल्या खान्देश वाहिनी कंपनीचे शेअर विकत घेतील आणि पैसा उभा राहिल.
Formations of media Company for raising funds
सहाव्या टप्प्या हा शेवटचा आणि स्वप्न पुर्ण करणारा टप्प्या आहे, या टप्प्यात आपण जळगाव आणी धुळे जिल्हात खान्देशी वाहिनीचे दोन स्टुड़ीओ उभे करणार आहोत आणी याच दोन्ही स्टुड़ीओ मध्येच आपल्या खान्देश वाहिनीचे ट्रान्समीटर लागतील आणी याच स्टुड़ीओ मधुन खान्देश वाहिनी खान्देशी जनतेची सेवा करेल.
Setting up Studio and TV transmitter
मित्रानो आता महत्वाचा मुद्दा म्हणजे खान्देश वाहिनी सुरु झाल्यावर पैसा कसा मिळेल?
प्रत्येक वाहीनी प्रायोजक आहे जाहिरातीतून पैसा कमावते खान्देशी व्यापारी मंडळी जाहीरात आणी प्रायोजकच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न स्वरुपात खान्देश वाहिनीला देतील ज्यामुळे खान्देशीतील साहित्यीक आणि कलावंतांना भरपुर मानधन मिळेल त्याच बरोबर खान्देश वाहिनी चालवण्यासाठी साठी लागणार्या नोकर वर्गाला देखील रोजगार उपलब्ध होईल आणी कंपनी गुंतवणूक केलेल्या शेअर धारकांना नफा होईल.
मित्रानो खान्देशातील जनता आपल्या पहील्या खान्देशी वाहिनीच्या प्रतीक्षेत आहे आणी आपण सगळे मिळून हे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजनबद्ध काम करु.
अवघड आहे पण अश्यक नाही
खान्देश वाहिनी