अयोध्येचा राजा
तुझ्यामध्ये राम । माझ्यामध्ये राम ।
जिथे सत्यकाम । राम तिथे ।।
राम शबरीच्या । झोपडीत जातो ।
उष्टे बोर खातो । भक्तीवश ।।
नको फुळमाळ । नकोच पक्वान्न ।
श्रीराम प्रसन्न । भाविकांना ।।
धर्मजातीमध्ये । विभागणे टाळा ।
समतेची शाळा । सुरू ठेवा ।।
अयोध्येचा राजा । अंतरी वसतो ।
श्रीराम शोभतो । जाणकीला ।।
वनवास घेई । हसत साहून ।
सोबत राहून । सीता माता ।।
त्यांच्यासम हवी । श्रीरामाची भक्ती ।
भक्तीमध्ये शक्ती । भरपूर ।।
नाही भेदभाव । श्रीराम अंतरी ।
पावतो श्रीहरी । भक्त जना ।।
अजू भक्त बन । नाही अंधभक्त ।
बोलू नको फक्त । कर्म कर ।।
©️®️शब्दसखा – अजय रमेश चव्हाण,तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ