अहिराणी पर्व
1 मार्च ते 11 मार्च या कालावधीत अहिराणी पर्व मिळून साजरे करू सर्व
अहिराणी पर्व साजरे करा
सर्व अहीर बंधु भगिनी तसच जगमाना बठ्ठा अहिराणी भाषा संवर्धनना पदाधिकारी कार्यकर्ते , अहिराणी भाषेसाठी कार्यकरणा-या विविध संघटना, अहिराणी प्रेमी, रसिक साहित्यिक यास्ले पोटतिडकीथून रावनाइ आपापल्या गावात, शाळा, महाविद्यालये, परिसरात, विभागात,घरात अहिराणी पर्व साजरे करा .
अहिराणी भाषेची व्याप्ती
अहिराणी भाषा श्रीमंत, समृद्ध, मधुर भाषा आहे. ती बोलणारे जगात दोन कोटी पेक्षा जास्त लोक आहेत. ही भाषा महाराष्ट्रातील खान्देश म्हणजे नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात तर बोलली जातेच, शिवाय सीमावर्ती गुजराथ, मध्यप्रदेश आणि मराठवाड्यातील सोयगाव(अजिंठा), कन्नड(वेरूळ) या भागातही बोलली जाते.
शिवाय सुरत, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, औरंगाबाद या भागातील औद्योगिक पट्यात मोठ्या प्रमाणात अहिराणी भाषा बोलणारा स्थलांतरित वर्ग आहे.
या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील मूळ गवळी वस्तीत अहिराणी भाषा बोलली जाते. तसेच जम्मू-कश्मीरच्या काही भागात अहिराणी भाषा बोलणारे लोक आहेत. उत्तर कर्नाटक राज्यातील होयसळ यादवांच्या राज्यातील काही जाती त्यांच्या बोलीत अहिराणी सदृश्य शब्द वापरतात.
अशा या दोन कोटी पेक्षा जास्त अहिराणी भाषिक लोकात अनेक कर्तबगार लोक होऊन गेले. त्यातील कुळ कायद्याचे जनक भाऊसाहेब हिरे यांची जयंती 1 मार्च आहे, तर महान समाज सुधारक महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती 11 मार्च ही आहे.
1 मार्च ते 11 मार्च हा कालावधी अहिराणी पर्व
दोघेही थोर व्यक्ती खान्देशी अहिराणी भाषिक होते म्हणून आपण 1 मार्च ते 11 मार्च हा कालावधी अहिराणी पर्व म्हणून साजरा करतो. भाऊसाहेब जयंती 1 मार्च हा किसान मुक्ति दिवस दिवस तर सयाजी महाराज जयंती 11 मार्च हा जागतिक अहिराणी भाषा गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतो.
अहिराणी पर्व कार्यक्रम
तर 1 मार्च ते 11 मार्च या कालावधीत अहिराणी पर्व साजरे करतो? या 11 दिवसात आपण उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ या मातृसंस्थेच्या अधिपत्याखाली जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद तसेच विविध अहिराणी भाषा संघटनां तर्फे सर्व विभागात अहिराणी भाषेत वक्तृत्व, निबंध, कथाकथन, नाटक, चित्रकला स्पर्धा . कवी सम्मेलन, व्याख्यानमाला भरवावीत उद्योग, व्यवसाय, रोजगार, महिला सबलीकरण यावर मार्गदर्शन शिबीर घ्यावेत असं विनम्र आवाहन करीत आहेत.
हे अहिराणी पर्वाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 11 मार्च रोजी सयाजी महाराज जयंतीला सर्वत्र,जागतिक अहिराणी गौरव दिनी, व अहिराणीना पर्वमा
अहिराणी वाचा..!,
अहिराणी बोला…!!
अहिराणी लिखा…!!!अहिराणी पर्व
बापूसाहेब हटकर
कार्याध्यक्ष
उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.




उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव!
3 thoughts on “अहिराणी पर्व”