खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत?

खान्देशात जल प्रकल्प का उभारले जात नाहीत?

पाण्याचे स्रोत असूनही खान्देशात,जल प्रकल्प का उभारले जात नाहीत?

           देशातील प्रत्येक राज्य आणि राज्यातील विभाग यांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा करत त्या भागात पिण्याचे पाणी, शेती साठी सिंचन आणि औद्योगिक वाहतीसाठी जास्तीतजास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न भारतभर सुरू आहेत. तसे खान्देशात का नाहीत? या बद्दल माझे दोन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे,
भारतात जशी टिहरी भाक्रानांगल, सरदार सरोवर, हिराकुड, नागार्जुन, इंदिरासागर, तुंगभद्रा, कृष्णासागर अशी महाकाय धरणे आहेत तशी ती महाराष्ट्रात का नाहीत?

       अशी महाकाय धरण बांधायला तेव्हढा जलस्रोत लागतो आणि अशी प्रचंड धरण बांधायला इच्छाशक्ती असलेला तेव्हढा मोठा महत्त्वाकांक्षी आणि बलवान नेता लागतो. हे समीकरण महाराष्ट्रात जुळत नाही म्हणुन एव्हढी मोठी धरणे महाराष्ट्रात नाहीत. 

        महाराष्ट्रात अशी महाकाय धरणे उभी राहतील एवढे पाणी फक्त खान्देशात आहे. पण तिथले नेते दुबळे आणि अदूरदर्शी आहेत. खान्देश सोडून महाराष्ट्रातील ईतर विभागात, शक्तिशाली नेते आहेत पण तिकडे पाणी नाही. तरी त्यांनी जमेल तेवढे पाणी अडवून त्यांच्या विभागात मोठी धरणे बांधली आहेत पण ते देश पातळीवरील महाकाय धरणांची बरोबरी करू शकत नाहीत.

        गुजराथ राज्यातील सरदार सरोवर हे देशातील सर्वात मोठे तिसर्‍या क्रमांकाचे धरण आहे आणि ते नर्मदा नदीवर बांधले आहे. ही नर्मदा मध्य प्रदेशातून येते, गुजराथच्या आधी महाराष्ट्र म्हणजे खान्देशातून वाहत जाते. नर्मदा मध्य प्रदेशातून 1077 किलोमीटर वाहते, गुजराथ मधून 161 की मी वाहते आणि खान्देश महाराष्ट्रातून 74 किलोमीटर वाहते. मध्य प्रदेशातून नर्मदा नदी पात्रातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाते. हिच्या येवढी एक सुद्धा नदी महाराष्ट्रात नाही.

या नर्मदेच्या पाण्यावर मध्य प्रदेशांत इंदिरा सागर हा खूप मोठा बांध बांधला आहे. याची साठवण क्षमता 432 टीएमसी आहे. नर्मदा नदीवर माहेश्वरी बांध मध्य प्रदेश आणि सरदार सरोवर गुजराथ हे ही असेच अवाढव्य बांध आहेत. त्याशिवाय या नदीवर 30 ईतर बांध प्रास्तावित आहेत. त्यातील एक बांध खान्देशात मंजूर झाला आहे. तो 34 टीएमसी चा बांध धडगाव तालुक्यात होता. तो महाराष्ट्र सरकारने गुजराथला विकला. कारण हे पाणी फक्त खान्देश मध्ये वापरले जाणार होते. म्हणुन मग 10 टीएमसी पाणी खान्देश साठी ठेवून महाराष्ट्राने 24 टीएमसी पाणी गुजराथला दिले आणि त्या बदली अधिकची वीज घेतली. कारण वीज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नांदेड कुठेही फिरविता येते.

       असा हा खान्देशचा घातक करार महाराष्ट्र गुजराथ यानी केला याचा खांदेशी माणसाला आणि पुढाऱ्यांना पत्ता नाही.

       नर्मदा व्यतिरिक्त तापी नदीत खान्देशच 191 टीएमसी पाणी पडून आहे. ते पाणी सुद्धा महाराष्ट्र सरकार अडवत नाही. गेली 30 वर्षे पाडळसरे धरण अपूर्ण अवस्थेत पडले आहे. त्याच खांदेशी माणूस आणि पुढारी यांना काही देणे घेणे नाही. महाराष्ट्र सरकार तापी नदीच पाणी अडवत नाही म्हंटल्यावर गुजराथ सरकारने आता उकाई धरणाची उंची दुप्पट केली आहे.

         सुरगाणा तालुक्यात केमच्या डोंगरावर 165 te 170 टीएमसी पावसाच पाणी समुद्रात वाहून जात. या डोंगरावरील 19 च्यावर पश्चिम वहिनी नद्या पूर्व वाहिन्या करून त्यातले सुमारे 50 टीएमसी पाणी गिरणा, मोसम, बोरी, पांझरा, बुराई नदीत सोडून या नद्या बारमाही करायच्या असा प्रस्ताव स्व भाऊसाहेब हिरे यांचा होता. पण केंद्र सरकारने तो प्रस्ताव कायमचा गुंडाळून ठेवला आहे. खांदेशी लोक आणि पुढारी झोपले आहेत.

       केमच्या डोंगरावरचे 100 टीएमसी पाणी गुजराथ नेणार आहे. 50 टीएमसी पाणी मराठवाड्याला देणार आहेत. भुजबळ साहेब 5 टीएमसी पाणी यवल्याला घेऊन गेले. ते अजून 5 टीएमसी पाणी वाढवून मागत आहेत.

         म्हणजे गुजरात 100 टीएमसी मराठवाडा 50 टीएमसी यवला 10 टीएमसी. एकूण झाले 160 टीएमसी. केमवर एकूण पाणी आहे 165 टीएमसी त्यातून 160 टीएमसी पाणी गेल्यावर शिल्लक राहत 5 टीएमसी पाणी यातून 10 टीएमसी पाणी फडणीस साहेब गिरणा नदीत सोडणार आहेत. 5 मधून 10 कस देतील हे मला अजून कळल नाही. हा एक जादूचा प्रयोग आहे. तरी पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू. 10 टीएमसी पाणी गिरणा नदीत सोडल. ते कोणाच्या नाकाला लावणार? मोसम, बोरी, पांझरा, बुराई यांच काय?

        महाराष्ट्राने स्वतः साठी खूप मोठमोठी धरणे बांधुन घेतली. प महाराष्ट्र पवना, मुळशी, कोयना, धोम, पानशेत, उजनी, तळइपल्ली,वाळन, वारणा, प्रवरा, भंडारदरा, गारगोटी, नीरा मराठवाडा जायकवाडी, मांजरा, विदर्भ तोतला डोह, गोशी खुर्द, वर्धा, कोकण भिवपुरी, सूर्या, भातसा अशी खूप मोठी धरण यानी महाराष्ट्रात बांधुन घेतली. जिथे पाणी नाही तिथेही धरण बांधुन घेतल. जायकवाडी बघा. केव्हढे मोठे धरण आहे. पण ते कधीच भरत नाही. मग एवढे मोठे धरण बांधले कशाला?

          शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले बांधले जायकवाडी धरण. असे महाराष्ट्रात 22 मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात मोठमोठी धरणे बांधुन घेतली. खान्देश मधून मुख्यमंत्री सोडा 77 वर्षात सादा उपमुख्यमंत्री नाही झाला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नसतो. तो त्याच्या जिल्ह्याचा किंवा विभागाचा मुख्यमंत्री असतो. म्हणुन तो त्याच्या विभागा पुरत काम करतो. खान्देश मध्ये मोठे धरण हवे असेल तर खान्देशचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तसा तो होत नाही तो पर्यंत 1 महिन्यात प्यायला पाणी आणि कायम स्वरूपी शेतीला दुष्काळ तुमच्या पदराला बांधलेला आहे.  अहिराणी मा म्हण से एक,
खोटा पैसा गाठना नी नकटा बेटा पोटना! आपला खांदेशी मुख्यमंत्री व्हवा बिगर खान्देशले न्याव भेटावं नही.
        याना संगे एक लिंक धाडेल से ती उघडा. गिल्ली दांडू खेनार पोरे शेवटला कडवामा हाईज सांगी र्‍हायनात. त्या म्हणी र्‍हायनात,
खान्देशन राज माले लयान से
खान्देशना मुख्यमंत्री कराना से
गिल्ली दांडूना खेय माले खेवाना से
        विचार पटला गाण आवडल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा खान्देशच्या घराघरात हा विचार पोहोचला पाहिजे.

बापू हटकर

#खान्देश #जलसंपत्ती #धरणप्रकल्प #नर्मदा #तापी #जलसंधारण #महाराष्ट्रराजकारण #खान्देशविकास #पाणीपुरवठा #धरणउभारणी #राजकीयनेतृत्व #जलसंवर्धन #शेतीसाठीपाणी #खान्देशमुख्यमंत्री #पाणीप्रश्न