खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी
निवडणूक आली की,खान्देशी बांधवांच्या मतांची आवर्जून आठवण ठेवून मतदानासाठी खान्देशी बांधवांना आवर्जून व हक्काने साकडे घालतात परंतु खान्देशी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय व त्यांच्या हक्काचा इतर वेळेस विसर होतोच परंतु निवडणूक प्रचार सभेत देखील सरसकट विसरून तो इतरांना देण्याचा संकल्प खान्देशातीलच एका मतदारसंघातील प्रचार सभेच्या व्यासपिठावरुन केला जातो तेव्हा खान्देशी बांधवांचा फक्त अपेक्षाभंगच होत नाही तर त्याच्या काळजाला ठेच पोहोचते याचे भान अशा नेत्यांना असलेच पाहिजे.

संदर्भ, खान्देशातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पिंपळगाव बसवंत येथे नुकत्याच चार दिवसापूर्वी झालेल्या प्रचार सभेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय,नरेंद्रजी मोदी साहेब,यांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नासिक जिल्ह्यात उगम पावणाऱ्या नार पार दमणगंगा व पिंजाळ सारख्या पश्चिम वाहिनी नद्यांचा प्रवाह वळवून पूर्व वाहिनी करुन गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येईल व त्याचा फायदा नगर जिल्हा व संपूर्ण मराठवाड्याचे सिंचन व पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी करुन देण्यात येईल
असा संकल्प बोलून दाखवला,त्यात त्यांनी खान्देशचा नामोल्लेख जाणूनबुजून टाळला तेव्हा समस्त खान्देशवासीयांच्या जखमेवरील खपली निघून त्यातून भळाभळा रक्त वाहत असतांना त्यावर मीठ चोळले गेल्याची भावना समस्त खान्देशवासीयांची झाली.

बंधूनो त्याचे कारण असे की,संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्या नंतर त्या वेळचे महसूलमंत्री व खान्देशचे लोकनेते आदरणीय, भाऊसाहेब हीरे यांनी भविष्यात नासिक जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात पाणी टंचाई निर्माण होऊन दुष्काळ सदृष्य परीस्थिती निर्माण होऊ शकते व ती परीस्थिती निर्माण होऊ नये म्हणून व त्यावर उपाय म्हणून दूर दृष्टी ठेवून नार पार, दमणगंगा सारख्या पश्चिम वाहिनी नद्यांचा प्रवाह वळवून पूर्व वाहिनी करुन तो प्रवाह गिरणा व तापी खोऱ्यात वळवून त्या भागातील पाणी टंचाईचा व सिंचनाचा प्रश्न कायम स्वरुपी सोडवता येईल अशी संकल्पना सर्व प्रथम मांडली,
परंतु दुर्दैवाने आदरणीय, भाऊसाहेब हीरे यांच्या नंतर खान्देशात त्यांच्या तोडीचे नेतृत्व उदयास आले नाही, व आहेत त्या नेतृत्वांनी आप आपल्या पक्षाच्या वरीष्ठांच्या पालख्या वाहून स्वतः चे राजकीय अस्तित्व टीकवण्याच्या नांदात खान्देशचे नंदनवन होऊ शकणाऱ्या एवढ्या मोठ्या योजनेचा पाठपुरावा केला नाही, एवढेच नव्हे तर ती योजना व नार पारचे नाव देखील विसरुन गेले.

आणि आदरणीय भाऊसाहेब हीरे यांची भिती खरी ठरली गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण खान्देशात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आणि दुष्काळाच्या झळा पोहचू लागल्या मग आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते, व आदरणीय भय्यासाहेब पाटील, आदरणीय बापूसाहेब हटकर आदरणीय सुरेश नाना पाटील,आदरणीय शशिकांत पाटील आदरणीय गणेश पाटील व इतर अनेक जण ज्यांचा जागे अभावी येथे उल्लेख करता येणार नाही असे खान्देशशी नाळ जुळलेले व तळमळ असणारे असंख्य कार्यकर्ते यांना, आदरणीय भाऊसाहेब हीरे यांच्या स्वप्नातील व संकल्पनेतील नार पार योजनेची प्रकर्षाने आठवण होऊ लागली.
व या बहुपयोगी योजनेची आठवण खान्देशी जनतेला व नेत्यांना करुन द्यावी, व ती संकल्पना आपल्या सध्याच्या नेत्यांनी प्रत्यक्षात उतरवावी हा हेतू व कळकळ मनात बाळगून सन २००२ पासून आदरणीय भय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली खान्देश हित संग्राम च्या माध्यमातून जनजागृती तसेच प्रास्थापित नेत्यांना जागे करायला सुरुवात केली. त्यासाठी स्वखर्चाने दौरे केले, संपूर्ण खान्देशातील गावो गावी जावून तेथील ग्रमस्थांना योजनेचे महत्त्व पटवून दिले, आमदार, खासदार व प्रास्थापित नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या व ही योजना खान्देशसाठी कीती महत्त्वपूर्ण व उपयोगी आहे.
हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. या योजनेचे महत्व खान्देशातील सामान्य जनतेला समजले, परंतु प्रास्थापित राजकीय पुढाऱ्यांनी व नेत्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले काहींनी ऐकून घेतले आणि सोडून दिले,काहींनी हा प्रकल्प अव्यवहार्य व खर्चिक आहे,त्यामुळे शासनाला परवडणार नाही असे उलट आम्हालाच समजावून आमची बोळवण करण्याचा प्रयत्न केला.
त्याचा परिणाम असा झाला की, आदरणीय नरेंद्रजी मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नजरेत हा पाण्याचा बहुमोल साठा आला. व त्यांच्या स्वप्नातील गुजराथच्या विकासा साठी या पाणी साठ्याचा उपयोग करण्याचा मनसुभा त्यांनी रचला व केंद्राच्या मध्यस्थीने महाराष्ट्र गुजरात पाणी वाटप करार करुन जास्तीत जास्त पाणी हीस्सा गुजराथच्या पदरात पाडून घेतला आणि त्या प्रमाणे ते पाणी साबरमती नदीला जोडण्याच्या दिशेने काम देखील सुरु झाले.

आणि मग राहीलेल्या पाणी साठ्यातून मा.छगन भुजबळ यांनी मांजर पाडा १ या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या मतदार संघाची तहान भागवून घेतली.आणि आता त्या व्यतिरिक्त राहीलेल्या पाण्यावर नगर आणि मराठवाड्यातील नेत्यांचा डोळा असून ते खान्देशच्या हक्काचे पाणी पळवून नेण्याच्या दिशेने उच्च पातळी वरुन प्रयत्न चालू आहेत. तरी सुद्धा आपल्या खान्देशातील राजकीय सत्ताधारी व विरोधी नेते मुग गिळून गप्प बसले आहेत आणि अशातच खान्देश भूमीत येऊन आपल्या राजकीय प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्रीच खान्देशच्या हक्काचे पाणी नगर मराठवड्याला देण्याचे जाहीर करतात.
तेव्हा या योजने कडे डोळे लावून बसलेले व खरोखरच दुष्काळ ग्रस्त असलेल्या माझ्या खान्देशातील शेतकरी बांधवांची व जनतेची मनाची काय घालमेल झाली असेल ते मा.उपमुख्यमंत्री व खान्देशातील राजकीय नेत्यांनी लक्षात घ्यावे.

आणि नार पार नदीजोड योजना ही सर्व. प्रथम खान्देश चे लोकनेते आदरणीय भाऊसाहेब हिरे यांनी मांडली व त्या नद्यांचे उगमस्थान देखील खान्देश विभागातच असल्या मुळे, त्यांच्या पाण्यावर भौगोलिक दृष्टीने व भावनिक दृष्टीने देखील सर्व प्रथम खान्देशचाच हक्क आहे व राहील हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे व तो हक्क इतरांना देण्याचा प्रयत्न. करु नये. नव्हे तो हक्क खान्देशलाच देण्याच्या दिशेने कार्यवाही करण्यात यावी असा खान्देश हित संग्राम च्या वतीने इशारा देत आहे.
माझ्या समस्त खान्देशी बंधू आणि भगिनींनो राष्ट्रहित प्रथम ही संकल्पना मलाही मान्य आहे. राष्ट्रहितातच आपले स्वहित आहे ही संकल्पना पण सत्य आहे. परुंतु राष्ट्रहित जपण्यासाठी आपले स्वअस्तित्व टिकवणे सुध्दा महत्त्वाचे आहे.
आपले अस्तित्व अबाधित असेल तर आपण राष्ट्रहित जपू शकू आणि आपले अस्तित्व म्हणजे आपल्या खान्देशचे आस्तित्व त्याच्या वरच जर घाला येत असेल तर राष्ट्रहीत कसे जपणार? आणि कुठल्याही देशाचे कींवा प्रांताचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी आणि ते पाणी च जर पळवून इतरांची तहान भागविली जात असेल तर खान्देशचे वाळवंट होईल आणि खान्देशी जनतेला स्थलांतरित व्हावे लागेल आणि अशा तऱ्हेने खान्देशचे अस्तित्व संपू शकते.

म्हणून मित्रांनो आपणास सांगू इच्छितो की, लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे.आणि मतदान हा आपला हक्क तर आहेच तसेच ते एक राष्ट्रीय कार्य आहे. आणि दि.२०/०५/२०२४ सोमवार रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १३ मतदारसंघात मतदान होत आहे.
या तेराही मतदार संघात जेवढे खान्देशी बांधव असतील त्यांनी आवर्जून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा व राष्ट्र हिताच्या नावाखाली आपले हक्काचे पाणी पळवणाऱ्या टोळीला मतदान. करायचे की, योग्य उमेदवारला मतदान करायचे हे आपण विचारपूर्वक ठरवावे एवढीच कळकळीची विनंती खान्देश हित संग्रामचा कार्यकर्ता म्हणून खान्देश हीता साठी करीत आहे.
जय खान्देश
कैलास पाटील
खान्देश हित संग्राम
9324354819
bjp maharashtra भाजप आणि खान्देशी नेते