जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका

घरका भेदी लंका डाही


तत्कालीन जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका
नार पार हा प्रकल्प आधी गुजरातला जातोय म्हटल्यावर बोंबाबोंब करणारे आज खान्देशवर अन्याय होतोय म्हणून बोलत नाहीत. गुजरात तर फक्त ३४ टीएमसी पाणी घेणार आहे. परंतु हा प्रकल्प राष्ट्रीय घोषीत करुन केंद्रात आघाडी सरकार असतांना २१ हजार कोटीची मंजुरी घेतली आहे. त्याच प्रकल्पातून २० टक्के पाणी मुंबईची २०५० ची तहान भागवायली जाणार आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही विरोध केला,

विधानसभेत तत्कालीन सिंचनमंत्र्यांना, आणि खान्देशातील एकुण दोन्ही सभागृहातील ४२ आमदारांना आम्ही पत्रव्यवहार केला, त्याच दिवसाला मिटींग घेण्यास भाग पाडले. आणि मग त्यावेळेस गुजरातने परत लबाडी करुन सांगितले की, नार पार मधुन आम्ही २६ टीएमसी पाणी घेणार आहोत, तितके पाणी आम्ही तापी खोय्रात महाराष्ट्राला देतो. पण हि लबाडी होती, आमचेच आज सुध्दा १०० टीएमसी तापीचे पाणी गुजरात वापरत आहे. तर ते आपल्याला काय देणार? आपली साठवण तरी आहे का?

नार पार प्रकल्प
नार पार प्रकल्प


       आम्ही नागपूर अधिवेशनात मा गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात खान्देशच्या आमदार आणि मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती, नाथाभाउंची पण भेट घेतली होती. परंतु सकारात्मक कोणीच बोलले नाही. फक्त देवलालीचे आमदार आणि मालेगावचे मुस्लिम आमदार यांनी आमची भूमिका समजून घेतली. शिवाय भविष्यात आवाज उठवायची जबाबदारी घेतली.*पण आपले मंत्री आणि आमदार उदासिन वाटले. त्यांना नार पार हा प्रकल्प समजला नाही त्यांना समजून घेणे सुध्दा गरजेजे वाटले नाही. खडसेंनी तर सरळ गिरिश महाजनांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकून दिली.

Water shortage in Khandesh
Water shortage in Khandesh


यांच्या काही भयानक प्रतिक्रीया बघा… किशोर आप्पा.. ते शक्यच नाही,इतका खर्च परवडण्यासारखा नाही, त्यापेक्षा तापीचे पाणी कन्नड घाटाकडे वळवून मग खाली चाळीसगावला गिरणा खोय्रात सोडायला पाहिजे. किती हा बालिश पणा? गुलाबराव पाटील.. नार पार आहे की आरआर माहित नाही मग गिरिश महाजनांच्या दालनात शिंदखेडयाचे आमदार रावल यांना सोबत घेवुन आमची बैठक पार पडली,तत्कालीन जलसिंचन मंत्री काय म्हणाले बघा, “अहो प्रकल्प व्यवहारी नाही, याचे पाणी लिफ्ट करावे लागेल, १हजार मिटरवरुन पाणी उचलावे लागेल, पर युनिट ३४ रुपये खर्च पडेल, असा व्यवहार जगात कुठेच नाही तरी पण बघुया आपण

धुळे पाणी समस्या
धुळे पाणी समस्या


आता बघा त्या नंतर मांजरपाडा १ हा लिफ्टिंग करून आणि १४ किमी चा बोगदा तयार करुन दिंडोरी चांदवड मार्गे येवल्याला पोहचला* *मग भुजबळांना आणि शासनाला हा प्रकल्प कसा परवडतो…?आमच्या वेळेस का नाही? मांजरपाडा १ आणि २ सोबत सुरु करु, निधी सारखा देवु असे तत्कालीन जलसिंचन मंत्री अजित दादा यांनी त्यांच्या दालनात शब्द दिला होता,पण फक्त मांजरपाडा १ झाला, दोनचा निधी सोडा डीपीआर सुद्धा झाला नाही त्या नंतर उन्मेष पाटील यांनी शब्द दिला होता, संसदेत विषय मांडेल, पण त्या फक्त लोंडेवरवाडे हा प्रकल्प करुन घेतला, ७ बलून बंधारे मंजूर करून मंगरीलालचे स्वप्न दाखविले

नदी नांगरा
शक्य आहे तिथे नदी नांगरा !


आता हाच प्रकल्प मराठवाडा आणि गोदावरी खोय्रासाठी व्यवहारी कसा झाला? उपसा सिंचनाचा त्यावेळचा ३२ रुपये पर युनिट नक्कीच ५० रुपये झाला असेल, मग आता कसे परवडणार? खान्देशातील लोकांना आणि खान्देशला देतांनाच परवड नाही.गिरीश महाजन देतील का उत्तर? ते खान्देश करता कधीच संकटमोचक नाहीत, खान्देशचे विनाशकारी नेतेआहेत हे, यांनी आता सरकारला का जाब विचारला नाही, खान्देशला देतांना तुम्हाला परवड नाही.? मग बाकी भागा करता कसे परवडतय? विचारायला धम्मक लागते. आपले पुढारी राजकीय रखेल झालेत, त्यांना फोडाफोडी, स्पर्धकांना संपविणे याच्यात जास्तच रस आहे.

पण विचार करा येणारा काळ तुम्हालाही माफ करणार नाही, आणि आम्ही गुपगमान चुप बसलो, आवाज केला नाही म्हणून आपल्याला सुद्धा काळ माफ करणार नाही. विचार करा, वेळ अजुनही गेलेली नाही. रस्त्यावरील, कायदेविषयक लढाईसाठी आपण तयार असले पाहिजे. नार पार हा प्रकल्प आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा*… आमचा बाप स्व भाऊसाहेब हिरे यांचे हे स्वप्न होते, नार पार करेल खान्देश ला हिरवेगार… एकमेकांचे उणेदुणे काढण्यात असुरी आनंद घेण्यापेक्षा एकत्र येवून हा लढा लडलाच पाहिजे…..


प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
९००४९३२६२६

नार पार प्रकल्प

Water shortage in Khandesh

शक्य आहे तिथे नदी नांगरा !

धुळे पाणी समस्या

Leave a Comment