पद्मश्री पुरस्कार वापसीचे वादळ देशभर घोंघावणार
दैनिक पोलीस शोध
संपादकीय
दि.25/12/2023
‘पद्मश्री’ पुरस्कार वापसीचे
‘वादळ’ देशभर घोंघावणार!
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय संजयसिंह यांची निवड झाल्याने देशातील क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा वादाचे वादळ उठले आहे. भविष्यातही महिला कुस्तीगिरांना शोषणाला समोर जावे लागेल अशी भीती व्यक्त करून राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलपिंक क्रीडा स्पर्धेतील कुस्तीगिरांनी व्यक्त केली आहे.
कुस्ती महासंघांचे वादग्रस्त अध्यक्ष आणि देशाच्या राष्ट्रीय महिला खेळाडूंनी ज्यांचेवर लैगिंक शोषणाचे आरोप केले होते असे ब्रिजभूषणसिंह यांच्या विरोधात कुस्तीगिर साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी चार महिन्यापूर्वी जतंर-मंतरवर बसून आंदोलन केले होते. ब्रिजभूषण यांनी लैंगिक शोषण केले असून आम्हाला न्याय मिळावा, त्यांना पदावरून बाजूला सारावे अशा मागण्यांसाठी या महिला खेळाडूंनी पीएमओ कार्यालय, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गृहमंत्री अमित शहा यांचेकडे व्यक्तिगत भेट घेवून या सर्व प्रकाराची माहिती दिलेली होती.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण यांचे कुटूंबिय किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींना महासंघाची निवडणूक लढण्यास परवानगी देणार नाही अशी शाश्वती दिल्यानंतरच कुस्तीगिरांनी जंतर-मंतर वरील आपले आंदोलन मागे घेतले होते. परंतू नुकत्याच झालेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत ब्रिजभूषणसिंह यांचे निकटवर्ती असलेले संजससिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सरकारेन आपला शब्द पाळला नाही.
संजससिंह म्हणजे एका नाण्याची दुसरी बाजू असून त्याच्या निवडीने महिला कुस्तीगिरांना न्याय मिळण्याच्या आशा अधिकच धुसर झाल्या आहेत. 15 ते 20 महिला खेळाडू क्रीडा मंत्र्यांना भेटल्या आणि त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले होते. आता यापैकी केवळ सहा मुली ठामपणे उभ्या आहेत. परंतू त्याही कितीकाळ ठामपणे अभ्या राहतील हे सांगणे अवघड आहे.
असे सांगून बजरंग पुनिया यांनी खेळाडूंवर दबावतंत्राचा किती वापर होतो आहे हे पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी साक्षीं मलिक आणि विनेश फोगाट यांना अश्रु अनावर झाल्याने त्या रडल्या, परंतू ही पत्रकार परिषद देशातील सत्ताधार्यांना दिसत नाही याचे आश्चर्य वाटते. संजयसिंह सारख्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड होणे ही फारच दुःखद बाब आहे, त्यांच्या निवडीमुळे भविष्यातही महिला कुस्तीगिरांच्या शोषणाची भीती आहे.
यापूर्वी जे बंद दारामागे घडत होते ते आता सर्वासमोर घडेल, अशा शब्दात संजयसिंह यांच्याबद्दल महिला खेळाडूंनी भीती व्यक्त केली आहे. म्हणजे ब्रिजभूषण ‘एक नंबरी’ तर संजयसिंह हा ‘दस नंबरी’ असल्याची खात्री महिला खेळाडूंना आहे. त्यामुळे त्यांनी संजयसिंह यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ऑलपिंक कुस्तीपटू साक्षी मलिकने ताबडतोबीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आपली निवृत्ती जाहीर केली असून कुस्तीगिर बजरंग पुनियाने आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार पीएमओ कार्यालयासमोर ठेवून परत केला आहे. बजरंग पुनियाचे पद्मश्री वापसीचे प्रकरण अवघ्या एका दिवसात देशातील घरा-घरात पोहचले. आणि देशातील समस्त क्रीडा क्षेत्रातून संतप्त भावना देशभर पसरल्या.
विशेष म्हणजे 2020 च्या टोकीयो ऑलपिंगमध्ये कास्यपंदक विजेता कुस्तीगिर बजरंग पुनियाने आपला ‘पद्श्री’ पुरस्कार परत करून एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे.
ते पत्र एक्सवर प्रसारीत झाले असून देशातील नव्हे तर जगातील खेळाडू ते वाचत असून आपल्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. त्या पत्राचा आशय अतिशय गंभीर असून कोणतीही आक्रमक भाषा या पत्रात वापरलेली नाही. परंतू त्या पत्रातून व्यक्त झालेली भावना अंगावर रोमांच उभे करणारी आणि केंद्र सरकारच्या ‘अक्षम्य’ कार्यपद्धतीवर संतप्त भावना व्यक्त करणारी आहे.
त्या पत्राच्या प्रारंभी म्हटले आहे की,
‘माननीय प्रधानमंत्री जी, उम्मीद है, की आप स्वस्थ होगें, और देश की सेवामे व्यस्त होगें, आपकी इस भारी व्यवस्ता के बीच आपका ध्यान हमारी कुश्तीपर दिलवाना चाहता हूँ ।
आणि तीन पानी लिहिलेल्या या पत्रात 40 दिवस चालेलेल्या आंदोलनाचा उल्लेख करून पूनियाने लिहिले की मागील तीन महिन्यात आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. आमच्या महिला कुस्तीगिर खेळाडूंनी केलेल्या निवेदनाची दखल घेवून ब्रिजभूषणवर साधी एफआयआर देखील दाखल केली गेली नाही. आणि पून्हा संजयसिंह सारख्या त्याच प्रवृत्तीच्या माणसाची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे मला मिळालेल्या पुरस्काराचा आता मला ‘किळस’ वाटायला लागला आहे. त्यामुळे ते परत करण्याचा मी निर्णय घेतला आहे. सरकारकडे न्याय नसेल तरी ईश्वराकडे ‘न्याय’ निश्चित मिळेल. इतक्या संवेदनशिल भाषेत लिहिलेले पत्र देशभर गाजते आहे, आणि या घटनेची दखल केंद्र सरकार गांभिरतेने घेत नसल्यामुळे बजरंग पुनियानंतर ‘पद्मश्री’ परत करण्याची घोषणा विरेंद्रसिंग या दुसर्या खेळाडूने केली आहे.
2021 मध्ये विरेंद्रसिंह याला पद्मश्री मिळाला असून ‘मी माझी बहिण आणि देशाची कन्या साक्षी मलिक’ हिच्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद्मश्री परत करेन असे त्याने एक्सवर लिहिले आहे. मला माझ्या बहिणीचा अभिमान आहे, असे सांगून त्याने त्याची पोस्ट सचिन तेंडुलकर आणि निरज चोप्रा यांना टॅग करत लिहिले आहे की देशातील सर्वोत्तम खेळाडूंनीही यावर निर्णय घ्यावा.
अर्थात ‘बात निकली है तो बहुत दूर तक चलेंगी’ या उक्तीनुसार देशातील महिला खेळाडूंना न्याय मिळाला नाही तर 2024 च्या लोकसभेची कुस्ती भारत विरूद्ध इंडिया अशी झाल्या शिवाय राहणार नाही. आणि या कुस्तीत ‘राहुल’ बजरंगच्या विजय झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया, विरेंद्रसिंग या कुस्ती पटूुंचे हे ‘वादळ’ देशभर घोंघावणार हे नक्की. या वादळााची ‘जन की बात’ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून केंद्र सरकारने यांची तत्काळ दखल घेवून हे फेडरेशच बरखास्त करावे. तुर्तास एव्हढेच.ता.क. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयने संजय सिंह यांनी नियुक्त केलेल्या कमिटीचे निलंबन केले आहे. त्याचे स्वागत होत आहे.