बेधडक जनसामान्याच्या प्रश्न २०२४ जागतिक निवडणूक रणधुमाळी चे वर्ष असेल
बेधडक…रोखठोक…जनसामान्याच्या प्रश्न २०२४ जागतिक निवडणूक रणधुमाळी चे वर्ष असेल!
विश्वात अनेक देशात लोकशाही,
एकाधिकारशाही अस्तित्वात आहे.जागतिक लोकमत लोकशाही प्रणाली ला अनुकूल आहे . या वर्षी अनेक देशात
लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. विशेषतः जगाचे लक्ष
भारत, अमेरिका व रशिया या देशातील निवडणुकीकडे लागले
आहे. कारण जागतिक पातळीवर
भारत सर्वात मोठा लोकशाही देश
आहे. त्याच प्रमाणे अमेरिका सुद्धा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे.
अमेरिका आज विश्वात सर्वात शक्तिमान राष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक देशावर त्याचा वचक आहे. युनो मध्ये सुद्धा व्हेटोमुळे
अमेरिका आपल्या शक्तीचे प्रदर्शन करीत असते. म्हणून विश्वात अमेरिकेची निवडणूक
सर्वात महत्वाची मानली जाते.भारतातील या वर्षीची निवडणूक खूप रंजक असणार आहे. आता तिला रंग चढायला सुरुवात झाली आहे.स्वातंत्र्यानंतर भारतात प्रथमच पंत प्रधान विरुद्ध सारे
राजकीय पक्ष एकत्र आले असून
कोणत्याही परिस्थितीत सत्ता
हस्तगत करायची याच ईर्षेने विरोधी पक्षनेते एक झाले आहेत.
विरोधी पक्ष जाणून आहेत की
अजूनही मोदींची लोकप्रियता
टिकून आहे व कोणताही विरोधी
पक्ष मोदी विरुद्ध निवडणूक स्वतंत्रपणे जिंकू शकणार नाही.
नाईलाजाने सर्व विरोधी पक्षांना
एकत्र यावे लागले आहे. गेल्या
दहा वर्षापासून अनेक पक्ष सत्तेवर नसल्याने त्यांची कुचंबणा
होत आहे. ज्याप्रमाणे मासा पाण्यावाचून जिवंत राहू शकत नाही त्याच प्रमाण सत्ता नसल्याने विरोधी पक्षांची अवस्था झाली आहे. म्हणून या वर्षाची भारतातील निवडणूक अत्यंत
चुरशीची होणार आहे या बद्दल
दुमत नाही..अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होत आहे. अमेरिका
हा देश अनेक देशातील नागरिक
तेथे येऊन स्थायिक झाले व हा देश उदयास आला.खरी स्पर्धा
सध्याचे राष्ट्राध्यक्ष श्री. बायडन
व माझी अध्यक्ष ट्रंप यांच्यात
असून काही भारतीय वंशाचे उमेदवार सुद्धा निवडणुकीत
भाग घेणार आहेत. त्यांचीही
बरीच लोकप्रियता असल्याने
ते पण स्पर्धेत उतरले आहे.
अमेरिकेत वंश भेद तीव्र असल्याने मागे ओबामा सारखे
अनेक नेते निवडून आले आहेत.
तसेच अनेक भारतीय नागरिकांनी
तेथे स्थलांतर केल्याने त्यांचे महत्व वाढले आहे.निवडणूक जवळ आली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटीसाठी
भारत दौऱ्यावर येतात.मागे २०१९ मध्ये ट्रम्प भारतात आले होते. त्यांनी अनेक शहरांना भेटी
दिल्या. कारण अमेरिकेतील
भारतीयांची मते आकर्षित करायची होती.तेथील मतदानात भारतीय नागरिकांचा अधिक टक्का असतो.तसेच आफ्रिकन नागरिकांचा येथे मोठा भरणा असल्याने त्यांचे मतदान म्हणजे
एक प्रकारे निकाल असतो. ते कोणत्या उमेदवार ला पाठिंबा असतो त्यावर त्यांचे भविष्य असते.
भारतात इतर देशाशी तुलना केली असता मतदार अधिक आहेत. भारताला तरुण राष्ट्र म्हणतात. कारण मतदानाचे वय १८ वर्ष पर्यंत केले आहे. त्यामुळे भारतात
मतदारांची खूप मोठी संख्या वाढली आहे. भारताच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष असते. कारण विश्वात भारत लवकरच महाशक्ती होणार आहे.
जर एखाद्या राष्ट्रात एकच व्यक्ती व त्याचा पक्ष वारंवार निवडून येत असेल तर त्या देशात मागील
बाजूने एकाधिकार शाही प्रवेश करते. म्हणून चीन, कोरिया, रशिया या सारख्या देशात हुकुमशाही प्रकट झालेली आहे.
पुतीन यांना अनेक वर्षे अध्यक्ष
पदावरून काढता येणार नाही असा कायदा पास केला आहे.
असाच नियम चीन मध्ये संमत
झाला आहे. पाक, तैवान,इंडोनेशिया या देशात सुद्धा
लवकरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत. असे अनेक
देश आहेत की याच वर्षात निवडणुका होणार आहेत. म्हणून
२०२४ हे वर्ष जागतिक निवडणुकीचे वर्ष आहे. आता पासून अनेक देशात निवडणुकीचे
पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. लोकशाही प्रणाली जरी
आदर्श असली तरी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असतो.
सत्ता मिळविण्यासाठी रक्ताचे
पाट वाहत असतात. अनेकांचे
कत्तली होतात. म्हणून
काही प्रमाणात नियम
कठोर असणे आवश्यक आहे .
खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे