महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार

महासंस्कृती मोहत्सव धुळे,जळगाव आणि नंदुरबार इथून हद्दपार केलेल्या खान्देशी कला!

भाग 8 वा महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार.महाराष्ट्रात विदर्भ, प महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खान्देश हे पाच विभाग आहेत. या पाचही विभागातं अनेक लोककला आहेत. एकट्या खांदेशात 21 लोककला आपण मागील सात भागात पाहिल्या. या सर्वं लोककलां गेल्या हजारो वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहेत.परंतु सध्या त्या अत्यंत बिकट परिस्थितीतून जातं आहेत. आता मनोरंजनाचे अनेक श्रीमंत पर्याय उपलब्ध झाले आहेत. सिनेमा, मालिका,नाटक यांच्यासी स्पर्धा करण लोककला कारांना अवघड झालं आहे. तसेच पूर्वी असलेला लोकांश्रय आणि राजाश्रय आता राहिला नाही. त्यामुळे लोककलाकारांच जगण अवघड झाल. म्हणून लोककलाकार देशोधडीला लागले आहेत. आता ते मोलमजुरी करायला लागले आहेत. म्हणजेच लोककला संपू लागल्या आहेत.

अनुदानाच्या माध्यमातून लोककलाकारना बोलावून लोककला मोहत्सव साजरा करण्याचा आदेश

त्या वाचविण्यासाठी मग सरकारनें प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये अनुदान देऊन त्या जिल्ह्यातील लोककलाकारना बोलावून लोककला मोहत्सव साजरा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला. यातील जिल्हाधिकारी कोणी खान्देश बाहेरचे तर कोणी महाराष्ट्र बाहेरचे. त्यांना कांय माहीत खांदेशात कोणत्या लोककला आहेत ते. 5 दिवस मोहत्सव साजरा करायचा होता. यात आपण पाहिलेल्या 21 कला सादर करायच्या होत्या. मिरवणुकीत तगतराव आणायला हवे होते. ज्या मैदानात कार्यक्रम सादर करायचे तिथे पाच दिवस खान्देशी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल ठेवायला हवे होते. तिथं खापरावरची पुरण पोळी, फुणके, कळण्याचीं भाकरी, पाटोड्या, डबुकवड्या विक्रीला ठेवता आल्या असत्या.

महासंस्कृती मोहत्सवात खानदेशी कलावंतांना स्थान नाही

खान्देशी खाद्य पदार्थ तयार करणारे अनेक महिला बचत गट होते. त्यांनी कांय वाट्टेलं ते पदार्थ दिले असतें. प्रादेशिक वेशभुषाच्या प्रदर्शन भरविले असतें. त्यासाठी ज्यांना या गोष्टी माहीत आहेत त्यांना बोलावून सल्ला मसलत केली असती तर सर्वं सुरळीत झालं असत. आणि खरोखरीचा महा संस्कृती महोत्सव झाला असता. पण असं काहीही चौकशी न करता काही तरी थातूर मातूर कार्यक्रम आयोजित केले. सर्वं भंपक नकली आणि नकली सादरी करण झालं. त्यात आपण पाहिलेल्या 21 लोककलातील एक कला म्हणजे वही गायन घेतली बस. बाकी मुंबई, पुणे, सांगलीचे कलाकार बोलाविले. ऑर्केस्ट्रा मागवला.ज्यांचा खान्देशी लोककलेसी काहीही संबंध नाही.

ऑर्केस्ट्रा तर युरोपीयन अपेराचा प्रकार आहे. बाकी राहिलेल्या कार्यक्रमात शाळेची मूलं कोंबयची. ही मुलं फुकट वापरांता येतात. ती मुलं काहीही कोळी नृत्य वगैरे सादर करतात. ते कोकणातील आहे. किंवा मग चित्रपटातील गाण्यावर डान्स सादर करतात. इथे कोळी नृत्य नको, भिल्ल नृत्य हवं. वीरनृत्य हवं. खान्देश बाहेरचे कार्यक्रम आणून ते खांदेशात सादर करायचे तर मग खान्देशी लोककला कारांनी जायचे कुठे? हे लोक कुठे त्यांच्या कला सादर करतील?

मृत्यू पंथला लागलेल्या या कला जिवंत कशा ठेवायच्या? याच कांय उत्तर आहे संबंधित अधिकाऱ्याकडे? जळगावात झालेल्या हां खेळखंडोबा पाहून जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील हे भयंकर रागावले. त्यांनी स्टेजवरच जिल्हाधिकाऱ्यानां खडसावले. हां सर्वं जनतेच्या पैसाच्या आपव्यय आहे असं दादा बोलले. नंतर तिथंच जिल्हाधिकाऱ्यानी माफी मागितली. धुळ्यात या पेक्षा वेगळं काही घडलं नाही. नंदुरबार मध्येत तर कहरच झाला. एक अनधिकृत ऐकीव माहिती अशी आहे तिथं असंख्य आदिवाशी कलाकार असून सुद्धा कर्णाटकातील नृत्य पथके आणल्याच कळत.

खानदेशातील महासंस्कृती मोहत्सवात महाराष्ट्रातील इतर कलाकारांना स्थान

दोन कोटीचीं गरज नाही. फक्त 50/60 लाख रुपये खर्च करा सोन्यासारखा संस्कृती महोत्सव भरवून दाखवतो. संस्कृती म्हणजे खान्देशी सर्वं लोककला, सर्वं खाद्य पदार्थ, गीत संगीत, नृत्य, वेशभुषा,अहिराणी, भिलाऊ भाषा हे सर्वं 5 दिवसांत सादर करू. त्यातून संस्कृती रक्षण होईल. बाहेरून व्यावसायिक कार्यक्रम भरमसाठ बिदगी देऊन मागवायचचे. तेवढ्या पैशात तर सर्वं कार्यक्रम सादर होतील. मुंबई, पुण्याचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा या खान्देशी लोककला नाहीत.

ज्यांना मालं त्यांना हाल नी कोल्हा कुत्रा लालेलाल

मराठी भाषेत म्हण आहे, धन्याला धत्तूरा आणि चोराला मलिदा अगदी त्याचं अर्थाची अहिराणी भाषेत एक म्हण आहे,ज्यांना मालं त्यांना हाल नी कोल्हा कुत्रा लालेलाल. आजून एक म्हण आहे मराठीत, आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय.हेच या महा संस्कृती महोत्सवात घडले. कशाचा कशाला मेळ नाही. मुळ योजना आणि योजने मागील उद्देश याचा बट्याबोळ झाला. सरकारनें काही तरी मनोरंजनाचे कार्यक्रम सांगितले म्हणून कोणालाही धरून काहीही सादर करा ही संस्कृती नाही. नंदुरबारसी कर्णाटकचा सांस्कृतिक कांय संबंध आहे? एक वेळ गुजरात, मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील कार्यक्रम घेतले असतें तर तेही चाललं असत. खांदेशात खान्देशी तमाशाचे अनेक फड आहेत ते आणता आले असतें. तरी खूप झालं असत.

महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार
महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार


महासंस्कृती मोहत्सव अनुदान निधी गिळन्कृत

लोककालाकार गरीब असतात. बरेचसे अशिक्षित किंवा अर्ध शिक्षित असतात. त्यामुळे त्यांचे आमदार, खासदार, मंत्री किंवा सरकारी अधीकाऱ्या सोबत लागे बांधे नसतात. त्यामुळे त्यांना अशा जागी प्रवेशच मिळत नाहीत. खरं म्हणजे हां सरकारी निधी याच लोकांच्या मालकीचा आहे. तेच नेमके वंचित रहातात आणि ईतर लोक हां निधी गिळन्कृत करतात. या गोष्टीला आळा बसला पाहिजे. सकारकडे कांय 72 कोटी रुपये पडून आहेत, त्यांना मालक कोणीच नाही म्हणून दिले 72 कोटी रुपये 36 जिल्ह्याना वाटून दिले अशी परिस्थिती आहे का?

नाही हजारो वर्षा पासून चालत आलेल्या लोककला मरत चालल्या त्या वाचविण्यासाठी हां उपक्रम आहे.त्यासाठी घाई गडबड करून उरकून घेण्याचा प्रकार कशाला करता? त्यासाठी महिने दोन महिने अवधी घ्या. जाणकार लोकांना बोलवा. त्यांची मदत घ्या. पत्रकार परिषद घेऊन किंवा जाहिरात देऊन हे कलाकार तुमच्याकडे येणार नाहीत. त्यांना त्यातलं काही समजत नाही. त्यांना प्रत्येक्ष जाऊन भेटाव लागतं.

मराठी साहित्य संमेलनात खान्देशी लोककलांचा कार्यक्रम

अंमळनेर येथील अ भा मराठी साहित्य संमेलनात खान्देशी लोककलांचा हां कार्यक्रम झाला तिथे 11 प्रकारच्या लोककला सादर केल्या आणि तोच कार्यक्रम प्रेक्षकांची वाह वाह मिळवून गेला.याच कारण; त्या कलांचा पाया हजारो वर्ष जुना आहे. त्यावर या मनोरंजनाच्या सुंदर इमारती उभ्या आहेत. सरकारी अनुदानातून त्या इमारती जर लोकां पुढे उभ्या केल्या नाहीत तर मग खासदार उन्मेषदादा पाटील म्हणतात त्या प्रमाणे हां सर्वं जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. सरकारी खर्चाने भरविले जाणारे नकली महासंस्कृती महोत्सव म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.


या विरुद्ध सर्वं लोककरानी आवाज उठवीला पाहिजे. आंदोलन केले पाहिजे, धरणे धरले पाहिजे.

बापू हटकर
 

1 thought on “महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार”

Leave a Comment