माजी सैनिकांच्या संदर्भातील अभिनव संकल्पनेवर आयुक्त गमेंचे शिक्कामोर्तब
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या माजी सैनिकांच्या संदर्भातील “अभिनव ” संकल्पनेवर आयुक्त गमेंचे शिक्कामोर्तब स्वागतार्ह.
महेशबाबा घुगे,
देशाचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी सैनिक आणि शेतकरी यांच महत्व अधोरेखीत करुन ” जय जवान जय किसान ” ची राष्ट्रीय घोषणा केली होती. दुर्दैवाने, शास्त्रींच्या पश्चात ती घोषणा केवळ कागदावरच राहिली. प्रत्यक्षात सैनिकांची, माजी सैनिकांची आणि शेतकऱ्यांची काय उपेक्षित होत आहे , हे सुर्य प्रकाशाईतके स्पष्ट आहे.
असे असले तरी विद्यमान जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना माजी सैनिकांच्या असलेली कळकळ लक्षात घेता त्यांनी , माजी सैनिकांच्या कल्याणार्थ एका “अभिनव“संकल्पनेला जन्म दिला आणि विभागीय आयुक्त आदरणीय राधाकृष्ण गमे यांनी त्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब केले ही स्वागतार्ह बाब आहे.
मी माजी सैनिक नाही, पण माझे वडिल माजी सैनिक होते. माजी सैनिकांची होणारी उपेक्षा लक्षात घेता त्यांनी मला,”धुळे जिल्हा माजी सैनिक संघटनेची
मूहूर्तमेढ ” रोवण्यात प्रेरणा दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी मा. शशिकांत दैठणकर यांच्या सहकार्याने मी ” धुळे जिल्हा माजी सैनिक संघटना ” रजिस्टर करुन या संघटनेच्या माध्यमातून खालील उपक्रम साध्य केलेत.
१– धुळे – नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिकांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून शासनाकडून, ५५ माजी सैनिकांना मोफत शेत जमीन उपलब्ध करुन दिली.
२– तत्कालीन राज्यपाल एअर चीफ मार्शल लतिफ साहेब, आणि तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्री. अरुण भाटिया यांच्या सहकार्याने धुळ्यातील आकाशवाणी कार्यालय परिसरात २०० बेघर माजी सैनिकांना घरासाठी मोफत जागा उपलब्ध करुन दिली. आज त्या जागेवर
माजी सैनिकांची आदर्श सैनिक कालनी ऊभी आहे.
३– तत्कालीन जिल्हाधिकारी मा.
शिवाजीराव पाटील यांच्या मदतीने व मार्गदर्शनाने, दुसर्या
महा युद्धातील, माजी सैनिक व त्यांच्या विधवांना प्रतिमाह तीनशे रुपये मानधन ( ६ हजार मिळतात) महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करवून घेतले.
४-तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्री. दिलीप बंड यांच्या मदतीने व तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अम्रुत सिंग वसावे या़च्या सहकार्याने, धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात, सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या साठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करवून घेतली.
५– सैनिक माजी सैनिकांना रास्त
दरातील जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी भुसावळला जावे लागायचे , ती गैर सोय टाळण्या साठी, न्यायोचित संघर्ष करुन ,धुळ्यात ही एस् टी केन्टईन कार्यान्वित केली.
६– एस. टी महामंडळातील कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या तत्कालीन माजी सैनिक सुरक्षा
रक्षकांना कायम करण्याचा आदेश पारित करुन घेतला.
७– तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक या. सुरेश खोपडे यांच्या
सहयोग आतून, माजी सैनिकांना पोलीस भरतीत, शारीरिक क्षमतेत सवलत ऊपलब्ध करण्याचा आदेश शासनाच्या
ग्रुप विभागाकडून पारीत करुन घेतला.
८– सैनिक माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांच्या नावे असलेल्या मालमत्तेला, स्थानिक स्वराज्य स़स्थाकडून करसवलत मिळविण्याचा आदेश, प्रदीर्घ संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाकडून मंजुर करवून घेतला. शासकीय सेवेत माजी सैनिकांना आरक्षण मिळावे म्हणून धुळ्यात न्यायोचित आंदोलन छेडले , त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्री. सिताराम कुंटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या आंदोलनाला महाराष्ट्रभर पाठींबा मिळाला आणि तसा आदेश पारीत करवून घेण्यातही यश मिळाले.
९– सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना ,शेतीसाठी आणि घरासाठी,शासनाकडून दिल्या गेलेल्या जमिनी , संदर्भात, तसेच ईतर कारणास्तव, शेजारी किंवा गांव गु्डाकडून होणार्या छळ वांदा पासून संरक्षण मिळावे
म्हणून महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून, सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना ” , “महत्वाची व्यक्ती ” संबोधुन पोलीस संरक्षण देण्याचा आदेश
पारीत करवून घेतला.
१०– विद्यमान जिल्हाधिकारी मा.
अभिनव गोयल, आमदार फारुख शहा, आणि महानगर पालिका
आयुक्त अमिताताई दगडे पाटील
यांच्या मदतीने , आदर्श सैनिक कालनीला जोडणार्या रस्त्यांचे
काम मार्गी लावले.
या व्यतिरिक्त, या वयातही, ( वय ७६ ) मी गरजवंत सैनिक , माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धाऊन जात असतो.सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ,जिल्हा सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कार्यालयाचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने , विद्यमान जिल्हाधिकारी अभिनव गोयल, यांनी कार्यान्वित केलेले माहिती संकलन करण्याचे अभियान , आणि क्रुतीशील महसुल आयुक्त या श्री. राधाकृष्ण गमे यांनी त्या अभियानावर केलेले शिक्कामोर्तब स्वागतार्ह आहे. विद्यमान सचिव मेजर डॉ निलेश पाटील, यांचे आणि त्यांना पाठबळ देणारे अपर जिल्हाधिकारी मा. श्री. देवदत्त केकाण, निवासी जिल्हाधिकारी
मा. श्री. गावंडे यांच योगदानही महत्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा तील माजी सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा लाभ घ्यायला हवा.
महेशबाबा घुगे.