मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४’ या योजने संदर्भात महिला भगिनींमध्ये काही प्रश्न आहेत… त्याची उत्तरे पुढील प्रमाणे :
Q. मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजना निवड यादी कधी लागेल?
Ans. या योजनेची अंतिम निवड यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी लागणार आहे.
Q. माझा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला आहे परंतु लग्न संबंध महाराष्ट्रात झाले आहे तर मी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो करू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासिल सर्टिफिकेट असायला हवे.
Q. पांढरी रेशन कार्डधारक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. नाही कारण पांढरे रेशन कार्ड हे अशा व्यक्तीला मिळते ज्याचे उत्पन्न जास्त आहे किंवा त्याला सरकारी नोकरी आहे आणि योजनेच्या शासन निर्णयानुसार तुम्ही अर्ज करू शकत नाही.
Q. अविवाहित मुली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात का?
Ans. नाही, या योजनेसाठी फक्त विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार महिला अर्ज करू शकता.
Q. माझ्याकडे जन्म दाखला नसेल तर मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो करू शकता, कारण जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासिल सर्टिफिकेट जोडू शकता. जन्म दाखला किंवा डोमासिल सर्टिफिकेट यापैकी कोणतेही एक कागदपत्रे तुमच्याकडे असावे.
Q. माझ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो करू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे जन्मदाखला असायला हवा, कारण शासन निर्णय दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्रे असायला हवे.
Q. रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. नाही, जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर रेशन कार्ड मध्ये नाव असणे अनिवार्य आहे. तुमचं नाव रेशन कार्ड मध्ये असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता.
Q. जर माझे नाव ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये असेल परंतु ओरिजनल रेशन कार्ड मध्ये नसेल तर अर्ज करू शकते का?
Ans. हो, तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड ची प्रिंट काढून ते डॉक्युमेंट सोबत जोडू शकता आणि अर्ज सुद्धा करू शकता.
Q. माझे लग्न झाले आहे आणि वय 21 वर्षापेक्षा कमी आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. नाही, जरी तुमचं लग्न झालं असेल परंतु वय 21 वर्षापेक्षा जास्त नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही.
Q. अपंग महिला मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो, अपंग महिला सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता.
Q. कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात का?
Ans. जर कुटुंब निराधार असेल आणि योजनेच्या नियमात बसत असेल तर अर्ज करू शकतात.

