राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला

राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला

भूषण रामराजे

सोशल मीडियामुळे

प्रादेशिक भाषांना सर्वाधिक लाभ झाला आहे. या लाभाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून खान्देशात बोलली जाणारी ‘अहिराणी’ बोलीभाषा आहे. कधीकाळी शाळा महाविद्यालय,

शासकीय कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी अहिराणी बोलणारा माणूस म्हणजे गावंढळ अशीच ओळख त्याठिकाणी असलेल्या सुसंस्कृत अर्थात कल्चर पीपलकडून करून दिली जात होती. परंतु सोशल मीडियाने या ‘सो कॉल्ड’ ‘कल्चर पीपल’लाही अहिराणी भाषिक गाण्यांवर झिंगण्यास बाध्य केले असून इन्स्टाग्राम, फेसबुक, यु ट्यूब यासह असंख्य सोशल मीडिया प्लॅटफार्मवर अहिराणी रिल्स, शॉर्ट व्हिडीओज् आणि फूल लेंथ गाण्यांचा

धुमाकूळ सुरू आहे. या धुमाकूळात एक १० वर्षांचा अहिराणी कलावंत दर महिन्याला किमान १० लाख व्ह्यूज खेचून विक्रम

राणी ई जायना परत अहिराणी गीत

करत असून सध्या हा बालकलावंत अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीत ट्रेंडिंग आहे. अंशुमन कैलास मोरे असे या १० वर्षीय बालकलावंताचे नाव आहे. विखरण ता. एरंडोल येथील रहिवासी असलेला अंशुमन पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. वडिलांचा बॅन्ड वादनाचा व्यवसाय असल्याने त्याच्यात उपजत कलागुण होते. गावात बॅन्ड मध्ये गाणे गाणाऱ्या अंशुमनवर खान्देशी कलावंत जगदीश संदानशिव यांची नजर गेली. १० व्या वर्षी आपल्या पहाडी आवाजात सुरांना खेळवणाऱ्या या बालकलावंताला, त्यांनी गायनाची संधी दिली अन् तेव्हापासून अंशुमनचा

प्रवास सुरू झाला. गेल्या काही महिन्यात त्याच्या ‘राजा तू मना राजा रे’, ‘तुना प्यार मा पागल व्हयना ये’ आणि ‘गोरी दिखस तू पोरी तू मना दिल मा बसी गयी’ ही गाणी धुमाकूळ घालत आहेत.

अस्सल खान्देशी आवाजाच्या अंशुमनचे रिल्स, व्हिडीओ सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. यातही “राणी ई जायना परत” हे गाणं यु ट्यूबवर धूम करीत आहे. केवळ चारच महिन्यात या गाण्याला ८ मिलियन अर्थात ८० लाख वेळा पाहिलं गेलं आहे. त्याच्या इतर पूर्ण गाण्यांच्या व्हर्जनलाही २० लाखांपर्यंत व्ह्यूज मिळत आहे. सुरू झालेल्या लग्नसराईत डीजेच्या तालावर अनेक वन्हाडी सध्या ‘गोरी दिखस पोरी’ या गाण्यावर बेभान होऊन नाचत असल्याचे दिसून आले आहे.



१० वर्षीय बाल कलावंत अंशुमन याच्या या करिष्यामुळे सध्यातरी खान्देशी म्युझिक इंडस्ट्रिचा सोशल मीडियात सूरमयी दबदबा आहे.

संपूर्ण खान्देश ले वेड लावणारा आवाज म्हणजेच..अंशुमन मोरे -बाळ कलाकार.. एकदा आवाज नक्की आयका,आंग ले काटा फुटा शिवाय ह्रावात नई..


राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला 3
राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला

Leave a Comment