रामजी तुझ्या अयोध्येत

रामजी तुझ्या अयोध्येत


हे प्रभू रामजी
तुझ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने
खूप खूप आनंद झाला
रामभक्त भाराऊन गेला
कारण
रामजी तुझ्या अयोध्येत तू
पाचशे वर्षा नंतर पुन्हा अवतरला
सारा भारत देश रममय झाला

प्रभू रामजी
तुझ्या येण्याच्या प्रवासात
वनवासापेक्षाही खूपच अडथळे होते
तुझ्या नावाचा वादविवाद पाहून
तुझ्या जन्मभूमीत तुला येता येत नव्हते

दावे प्रतीदावे अनेकांनी केलेत
हक्कासाठी किती लढलेत
कारसेवकांनी रक्त सांडले
साधुसंत रामभक्त मंदीरासाठीच भांडलेत

पर्वा जीवाची नकरता रामभक्तांनी
मशिदीचा घुमट पाडला
त्यावर भगवा ध्वज लावला
आणि अख्या देशात
जय श्री रामाचा गजर झाला

सत्तेसाठी उगाचच रामजी तुला
राजकारणात ओढून घ्यायचे
बाकी सारे दुरून गंमत बघायचे
मंदिर मशिदीच्या वादातून
राम तुला मुक्त होता येत नव्हते
तुझ्या नावाचा फक्त गैरवापर करत होते.

किती ओरडलेत किती भांडलेत
आता सारेच समज गैरसमज
दावे प्रतीदावे दुर झालेत
प्रभू रामजी कोर्टाच्या चौकटीतून तुला
सहिसलामत बाहेर काढले
साऱ्या देशात भगवे फडकले

राम तू पुन्हा अयोध्येत आलास
खऱ्यार्थाने नरेंद्र वचन मुक्त झाला
आज पुन्हा रामजी भारत देशात
आनंदोत्सव साजरा होत आहे.
तुझ्या प्राणप्रतिष्ठेसाठी सारे देवलोक
पृथ्वीतलावर येत आहे

हे रामजी
प्रत्येक रामभक्त तुझ्यासाठी
अयोध्येत धाऊन आला
तूझ्या प्राणप्रतिष्ठेने गहिवरून गेला
साऱ्या देशात दिपोत्सव होता आहे
तुला सिंहासनस्थित होताना
डोळेभरून पाहत आहे.

आता अभिमानाने म्हणले
गर्वाने सांगेल
इस देश में है अयोध्या धाम
हर युग हे रहेंगे रामही राम
जय श्री राम

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)

1 thought on “रामजी तुझ्या अयोध्येत”

Leave a Comment