विजय अंती ख-याचाच झाला

विजय अंती ख-याचाच झाला


कुठे राम आहे कुठे राम नाही
असे तीर्थ दावा जिथे राम नाही

कुणाची धरा ही नद्या ह्या कुणाच्या?
म्हणा शरयुसिंधू इथे नाम नाही

अयोध्या कुणी निर्मिली नाव सांगा?
कसा जन्मला मग तिथे राम नाही?

मुखी राम हिंदूच जपती सनातन
जिभेवर दुजे का बरे नाम नाही?

किती दीर्घ वनवास भोगून झाला?
तरी लाभले का खरे धाम नाही?

खरा घात केला यवन इंग्रजांनी
दुवाडास कळला हरे राम नाही

कुणी मारले कारसेवक निरर्थक?
दुजोरा दिला का? कसे ठाम नाही

अकारणच वाया उगा काळ गेला
तरी मुक्त केला स्वये राम नाही

‘किरण’ विजय अंती ख-याचाच झाला
दिवे लाख नाही असे ग्राम नाही

वृत्तबद्ध रचनाकार
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

Leave a Comment