शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन

शालेय  शिक्षण  विभागाचा महत्वपूर्ण  निर्णय दिनांक :- 15 मार्च 2024 डॉक्टर, इंजिनिअर  प्रमाणे शिक्षकांच्या  नावापुढे  देखील  इंग्रजी भाषेत ” Tr ”  तर  मराठीत ” टी ” असे  संबोधन  लिहिता  येणार.

शिक्षकांना ड्रेस कोड

तसेच  राज्यातील  सर्व व्यवस्थापनाच्या  शिक्षकांना  ड्रेस कोड  लागू राज्यातील  सर्व  संबंधित व्यवस्थापनांच्या  शाळा  अंतर्गत कार्यरत  शिक्षकांच्या  नावापूर्वी इंग्रजी  भाषेत  ” Tr ”  तर  मराठी भाषेत  ” टी ” असे  संबोधन लावण्यात  यावे.  तसेच  या संदर्भातील  बोधचिन्ह  शिक्षण  आयुक्त  पुणे  यांनी  सुनिश्चित करून  त्यास  प्रसिद्धी  द्यावी. तसेच  संबोधन  व  बोधचिन्ह शिक्षकांना  त्यांच्या  वाहनावर देखील  लावता  येईल. शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु/ मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते.

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन
शिक्षकांना  ड्रेस कोड लागू

सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे शिक्षकीय पदाची वेशभूषा ही महत्वाची असते ही बाब विचारात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्यांक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसाहित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळेतील कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत शालेय शिक्षण विभागाद्वारे पुढील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन शिक्षकांना ड्रेस कोड


सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव शिक्षकीय पदास अनुसरून असावा


सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार / चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहेराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करू नये.

परिधान केलेला पेहराव कसा असावा


🔹 परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.
🔸  उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
🔹  पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेरावाचा रंग कोणता असावा हे संबंध शाळेने निश्चित करावे.
🔸  पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
🔹 महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे ( उदा. पुरुषांनी शुज ) यांचा वापर करावा.
🔸  स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचे ड्रेस राहतील
🔹  वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना/ महिलांना बूट वापरण्यातून सवलत देण्यात यावी.


   

         प्रा.  मनोज  पाटील
               कार्याध्यक्ष

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ
        राज्य समनव्यक
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ
        माजी मंडळ सदस्य
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभाग
 9421202211

शैक्षणिक – Khandesh Vahini News

आठ लाखांपर्यंत उत्पन्न मुलींना उच्च शिक्षण मोफत

Leave a Comment