श्रीराम प्रकटले
५०० वर्षांनी अयोध्येचा
राजा आला घरी
आभूषणांनी नटली
आज अयोध्या नगरी
आज साजरी झाली
घरोघरी दिवाळी
रामचंद्र परतले,
संपली रात्र काळी
त्यांची तेजस्वी मूर्ती
पाहून रमले मन
भूमीला स्पर्शिले
त्यांचे मंगल चरण
रांगोळी,देखावे,पताका
नटली भारत भूमी
अतोनात संघर्षानंतर भरून
निघाली प्रभूंची कमी
सर्वत्र आनंद,उल्हास,
उत्साह पसरले
भगव्या ध्वजांनी गगन
भगवे झाले
आला आज
इतिहासातला सुवर्णक्षण
सावळ्या रामाला बघून
मोहीत झाले मन
राम येण्याचं सर्वत्र
आहे जल्लोष
आकाशात दुमदुमू लागला
जय श्री राम घोष
घेऊ या श्रीरामांच्या
जीवनातून आदर्श
यश मिळवू करुनी
जीवनात संघर्ष
प्रत्येक शुभकार्यात करूया
त्यांचे स्मरण
करू शुभकार्य चालू
वाकुनी मंगल चरण
२२ जानेवारी २०२४
पियूष चंद्रकांत गांगुर्डे
इ.१० वी
जनता विद्यालय पवननगर नाशिक