सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात महिलांनी आबा चौधरी यांच्या धार्मिक गीतांवर ठेका धरला.
छत्रपती संभाजी नगर,बजाजनगर येथील जल्लोष ,,आबा चौधरी, धिरज चौधरी खान्देश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड शिरपूर,,, चा संगीत मय तालावर लहान थोर अबाल वृद्ध तसेच महिला भगिनी नी खान्देशी गाण्याच्या बेधुंद आनंद घेऊन आई भगवती चा प्रथम वर्धापन दिवस साजरा केला,,,जय मातादी,,
वाळूज महानगर खान्देश बांधव आणि सप्तशृंगी माता मंदिर संस्थानतर्फे आयोजित कार्यक्रमास उद्योगनगरीत राहणारे शेकडो खान्देश बांधव सहकुटुंब उपस्थित होते. या वेळी खान्देशातील सुप्रसिद्ध गायक आबा चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध धार्मिक गीते सादर केली. तब्बल तीन तास सुरू असणाऱ्या या कार्यक्रमात लहानांपासून, महिला व ज्येष्ठ यांनीसुद्धा या गीतांवर ठेका धरला होता.
बजाजनगर येथील चिंचबन कॉलनीत मागील वर्षी सप्तशृंगी मातेचे मंदिर उभारले आहे. मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सप्तशृंगी मातेचे पूजन आणि महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गायक आबा चौधरी यांनी त्यांच्या उपस्थितांशी अहिराणी बोलीत संवाद साधत विविध कानबाई,गौरांई ,सप्तशृंगी माता भक्तीगीते सादर केली.त्यात माता भगवतीचे भवभक्तिगीत, जागार कानाबाई मातेची अहिराणी गीते व धार्मिक गीतांचे सादरीकरण केले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पदाधिकारी आणि कार्यक्रम आयोजक
संस्थानातील पदाधिकारी, अध्यक्ष मनोहर सनेर, सचिव देवीदास चौधरी,किशोर पाटील, रवींद्र पाटील,कांतीलाल महाजन, कैलास पाटील,किशोर पाटील, बजरंग पाटील, योगेश सोनवणे, सतीश पाटील, प्रवीण पाटील,जितेंद्र देसले, सचिन पाटील यांनी सप्तशृंगी माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.