हळद पिक सल्ला आले पिक सल्ला
हळद पिक सल्ला
करपा व पानावरील ठिपके
(रोगकारक बुरशी: कोलेटोट्रिकम कॅपसिसी अथवा टॅफ्रिना मॅक्युलन्स)
सकाळी पडणारे धुके व दव हे वातावरण रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल असते. ‘कॉलेटोट्रिकम कॅपसिसी’ बुरशीमुळे पानावर अंडाकृती ठिपके पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. ‘टॅफ्रिना मॅक्युलन्स’ या बुरशीमुळे पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके आढळतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.
नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तीव्रता वाढल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे
आले पिक सल्ला पानावरील ठिपके
(रोगकारक बुरशी: फायलोस्टीका झिन्जीबेरी)
ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० टक्क्यांच्या वर राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
नियंत्रणासाठी, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.