हे रामा
हे रामा तू आला
अन
देश विदेश आनंदला .
तू आला आहेस तर
फक्त आयोध्या धामात
बसू नकोस ?
बाहेर पण फिर जो .
विविध घोटाळे
अन्याय अत्याचार
यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना
बळ देजो … .
रामा ,
शेतकऱ्याचा माल आला
की भाव कसा पडतो
हे पण अंतर्दृष्टीने शोधजो .
महिलांवरील अत्याचाराचा
पर्दाफाश करजो .
लाखो कोटी रुपये खर्च करुन
तयार होणारे रस्ते , पुल
निर्मिती नंतर
अल्पावधीत कसे
खराब होतात
हे शोधण्यासाठी
एखादं पथक तयार करजो .
ड्रग माफिया , वाळू माफिया
ऑनलाईन नोकरीत घोटाळा
करणारे … . . . .
यांना शोधण्यासाठी वानरसेना
पाठवजो …
धर्माच्या नावाखाली दुही पसरविणारे पण शोधून काढजो .
शेतकरी ,कामगार , तरुणांना लुबाडणाऱ्यांना तुझ्या बाणाने
ठिकाणावर आणजो.
तुझ्या नावाने
अंधश्रद्धा पसरणार नाही
याची पण काळजी घेजो .
अन देशात विकासाचा
डंका कसा वाजेल
यासाठी नवी चेतना निर्माण करजो …
नाहीतर लोकं म्हणतील ,
रामाने स्वतः चं धामच
विकसित केलं .
यासाठी
हे रामा
तुझ्यावरुन मतभेद होणार नाही
याची काळजी घेजो .
अंधश्रद्धा मुक्त भारत ,
विकसित भारत बनविण्यासाठी
सदैव सर्वांना प्रेरणा देजो .
हे रामा
देशवासियांतर्फे हार्दिक स्वागत
एकनाथ लक्ष्मण गोफणे
