मू.जे. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नेट सेट ची कार्यशाळा
येल विद्यापीठ, यु.एस. आणि रेनेस विद्यापीठ, फ्रान्स येथील शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन
जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील सुक्षजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातर्फे दि. १९ व २० जानेवारी २०२४ रोजी “शिक्षण व संशोधन क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा: नेट व सेट” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेचे उदघाटन विभागप्रमुख प्रा. डॉ. केतन नारखेडे यांनी केले. या कार्यशाळेत एकूण १० सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशीचे उदघाटनासह एकूण पाच सत्र हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. तर दुसऱ्या दिवसाचे पाच सत्र हे ऑनलाईन पद्धतीने घेतले. पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रसाद निकुमे यांनी ‘मेटाबोलिक पाथवेज’ या विषावर घेतले. तिसरे सत्र प्रा.राजेश सगळगिळे यांनी ‘स्पर्धा परीक्षेतील यशासाठी आवश्यक असणारी मेहनत आणि सातत्य’ या विषयावर घेतले. चौथ्या सत्रात प्रा. अभिजित पाटील यांनी ‘प्लान्ट फिसिओलॉजि व प्रकाश संश्लेषण’ या विषयावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रिसर्च स्कॉलर उझ्मा नाझ शेख इक्बाल यांनी नेट सेट ची तयारी कशी करावी आणि त्यासाठी कोणती पुस्तके वापरावीत याचे सविस्तर विश्लेषण केले.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सी.के.टी. कॉलेज, न्यू पनवेल येथील प्रा. गणेश साठे यांनी ‘मोलेक्युलर बायोलॉजि’ या विषयावर व्याख्यान दिले. शिवाय त्यांनी सुक्षजीवशास्त्रातील विविध संधी आणि त्यासाठीच्या परीक्षा याचा उलगडा केला. दुसऱ्या सत्रात इन्स्टिटयूट फॉर अडव्हान्स स्टडीज, पुणे येथील तज्ज्ञांचे विविध शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राला येल विद्यापीठ, यु.एस. येथील पोस्ट डॉक्टरल फेलो आणि रेनेस विद्यापीठ, फ्रान्स येथील शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. नमिता महाडिक यांनी ‘लाईफ सायन्स मधील संशोधन संधी आणि कॅन्सर रिसर्च’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
चौथ्या सत्रात एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई येथील डॉ. समाधान वाघमोडे सरांनी ‘मेम्ब्रेन्स’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना नेट व सेट सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचे आव्हान केले. शेवटच्या सत्रात यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, कराड येथील प्रा. प्रवीण बाम्बरे यांनी परीक्षा आणि आपण करावयाची तयारी यावर चर्चा करत, आपण कसे घडलो याबाबत विवेचन केले. याच सत्रात खामगाव येथील तुषार अशोक वानखेडे यांनी नेट सेट च्या पहिल्या पेपरची तयारी कशी करावी व प्रत्याशिकदृष्ट्या नियोजन कसे करावे याबद्दल संवाद साधला. सदर कार्यशाळेत पदव्युत्तरचे ६० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सादर कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद निकुमे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.