खान्देश लेख विशेष लेखक बापू हटकर
विकासाची वाट,
बाय पास खान्देश!
मी पूर्वी एक लेख लिहिला होता महाराष्ट्र विकास बाय पास खान्देश. म्हणजे धुळे नाशिक बस बाय पास मालेगाव. बस धुळ्या वरून सुटून नाशिकला जाईल पण वाटेतील मालेगाव टाळून पुढे जाईल. मालेगावात थांबणार नाही. यांचा अर्थ धुळ्या वरून नाशिक कडे सुटणाऱ्या बस मधून मालेगावसाठी जाणाऱ्या प्रवाशांना जागा नाही. तसेच मालेगावातुन नाशिकला जाणाऱ्या प्रवाशानाही या गाडीचा लाभ घेता येणार नाही.
अगदी तसंच महाराष्ट्र विकास कामाच आहे. महाराष्ट्रातील सर्वं विकास काम ही बाय पास खान्देश असतात. मग ते जल सिंचन असो, कारखानदारी असो, रोजगार असो, रेल्वे असो, कीं रस्ते विकास असो, ही सर्वं कामे मुंबई ते विदर्भ व्हाया कोकण पं महाराष्ट्र, मराठवाडा, बायपास खान्देश असी असतात. खान्देशला त्यात प्रवेश नाही.
ई स 2014 पासून महाराष्ट्राचं सत्ताधारी पक्षाचं नेतृत्व नागपूर मधून आहे. केंद्रीय रस्ते विकास खाते मा नितीनीजीं गडकरी आणि मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीरभाऊ मनगुट्टिवार हे मंत्री आहेत. चंद्रशेखर 52कुळे हे भाजप प्रदेश अध्यक्ष आहेत आणि विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत. म्हणजे सत्तेच केंद्र नागपूर भोंवती आहे. त्यामुळे त्या भागातून इन्फास्ट्रक्चरची काम इथून सुरु होतात आणि ती मराठवाडा, पं महाराष्ट्र, कोकण, मुंबई पर्यंत पोहचतात. त्यात खान्देश एका कोपऱ्यात सुटून जातं. तिकडे विकास फिरकतचं नाही.
आता नागपूर गोवा हां राज्यातील सर्वात मोठा एक्स्प्रेश हाय वे तयार होणार आहे. हां महामार्ग 800 कीं मी पेक्षा जास्त आहे. विदर्भ, मराठवाडा, पं महाराष्ट्र, कोकण यातून तो जाईल. तो महामार्ग बायपास खान्देश आहे. यापूर्वी मुंबई नागपूर हां समृद्धी महामार्ग तयार झाला आहे. हां मार्गही बाय पास खान्देश आहे. या विरुद्ध खान्देशी लोकांनी लढा उभा केला पाहिजे. खान्देशनें आपला विकास वाटा घेतला पाहिजे.
रेल्वेचही तसंच आहे. मराठड्यातील पुढारी रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यांनी मराठवाड्यात रेल्वेच जाळ वीणत आहे. त्यांनी जालन्यासह अनेक शहरांतून वंदेभारत रेल्वे सुरु केल्या आहेत. तसेच लातूर येथे वंदे भारत रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरु केला आहे. त्यातून मोठा रोजगार मिळाला आहे. तसेच लातूर शहरांची भरभराट होतं आहे.
हे सर्वं खान्देशच्या वाट्याला कधी येईल? खान्देशची भरभराट कोण आणि कधी करेल. त्यासाठी खान्देशचा मुख्यमंत्री हवा. पं महाराष्ट्राचे 7, कोकणातील 7, विदर्भातील 4, मराठवाड्यातील 4 असे एकूण 22 मुख्यमंत्री झाले. त्यात खान्देशचा एकही मुख्यमंत्री नाही. म्हणून आपला विकास नाही. आपलें लोक प्रतिनिधीही सभागृहात बोलत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात खान्देश हां तळाला गेला आहे.
आजही महाराष्ट्रातील अनेक पुढारी मुख्यमंत्री पदासाठी डोक्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सुप्रियाताई, रश्मी वहिनी, पंकजाताई यांचा समावेश आहे. यांचे कार्यकर्ते अधून मधून मंगल अष्टके म्हणत त्यांच्या डोक्यावर अक्षता उधळत असतात.
या नवरदेवात खान्देशचा कोणीही नवरदेव नाही. ते तिकडे बाशिंग बांधून तयार आहेत तर खान्देशातून कोणी सोयरीक बघायचं सुद्धा बोलत नाही. कसं होईल खान्देशचं?
यासाठी खान्देशातून नवे नेतृत्व घडवाव लागेल. त्यासाठी नव्या दमाचे तरुण नेते शोधावे लागतील. कारण जुन्या नेत्यांच्या भावना आता बोथट झाल्या आहेत. त्यांना कोणतीही महत्वाकांक्षा नाही. खान्देशची अस्मिता नाही. लोकांचे कल्याण करायची ईच्छा शक्ती नाही. त्यांना एकच चिंता असतें ती म्हणजे, आपली आमदारकी शाबूत कशी राहील. जमलं तर एखाद मंत्रिपद असावं. याच्यापुढे त्यांची आकांक्षा नाही.
खान्देशात विकासाचा खूप मोठा अनुशेष तयार झाला आहे.
1 रेल्वे मार्ग-इंदूर-मनमाड
2 नंदुरबार-साक्री, नामपूर, सटाणा, मालेगाव मनमाड,
3 दोंडाईचा-शहादा- म्हसावद-तोरणमाळ इथे माथेरान सारखी छोटी रेल्वे हवी.
4 सावदा-पालं छोटी रेल्वे हवी
5 नांदगाव-पाटनादेवी- चाळीसगाव-अजिंठा-जामनेर -भुसावळ- नांदगाव अशी रेल्वे रिंगरूट असावी. त्यावर दिल्ली-आग्रा सारखी पॅलेश ऑन व्हील लक्झरी पर्यटन रेल्वे गाडी सुरु करावी.
सध्या तयार मार्गवरून नव्या रेल्वे गाड्या सुरु करा.
1 धुळे-मुंबई
2 नाशिक-भुसावळ-आयोध्या
3 सुरत-नंदुरबार-चाळीसगाव- पंढरपूर.
तसेच खान्देशच्या हिस्याच सर्वं पाणी अडवून पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनाच पाणी द्या. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कारखाणे उभारा. धुळे येथे कृषी विद्यापीठ स्थापन करा. मालेगाव येथे मुंबई उच्चं न्यायालयाचे खंडपीठ तयार करा.
या सर्वं मागण्यासाठी लढाई सुरु करावी लागेल. चांगले नेतृत्व उभ करावं लागेल.
खान्देशकीं सोच पगले मुसीबत आनेवाली हैं.
तेरी बरबादीके मशवरे हैं जहाँमे.
नां समजोगे तो मीट जाओगे खान्देसीयो,
तुम्हारी दास्ता तक नही होगी दास्तानोमे.
घरेघर संदेशlसोनाना खान्देश
1 thought on “विकासाची वाट बाय पास खान्देश”