मराठी पशु पाळतय आणि गुजराथी दूध काढतय
महानंद अमूलला नको गोकुळलां द्या
महानंद अमूलला नको
गोकुळलां द्या!
मराठी पशु पाळतात नी
गुजराथी दूध काढतात!
महाराष्ट्र सरकार महानंद डेअरी अमूल दूध गुजराथ यांना हस्तांतरित करत आहे
दूरदर्शन बातम्यात आणि वृत्त पत्रात परवा एक बातमी ऐकायला मिळाली. महाराष्ट्र सरकार महानंद ही आपली डेअरी अमूल दूध गुजराथ यांना हस्तांतरित करत असल्याचे तें वृत्त आहे. या विषयावर सरकार आणि विरोधक यांच्यात वृत्तपत्रातून चांगला कलगी तुराही रंगला होता.
महाराष्ट्र सरकारनें अमूल गुजराथलां आपली महानंदा डेअरी हस्तांतरित करण हा शुद्ध वेडेपणा आहे. गावातील अशिक्षित अर्ध शिक्षित शेतकरी, भूमीहीन पशुपाळ तें थेट उच्चं शिक्षित अभियंत्या पर्यंत लाखो लोकांना रोजगार देणारा हां उद्योग व्यवसाय आहे.
गोकुळ डेअरीकडे सोपवीला जावा
तो गुजराथच्या हवाली नं करता कोल्हापुराच्या गोकुळ डेअरीकडे सोपवीला जावा असं माझं मत आहे. गोकुळचं दूध आज मुंबई आणि उपनगरात मोठया प्रमाणात वितरित केले जात आहे. मुंबईचीं दुधाची तहान खुपं मोठी आहे. सरकार आणि इतर सर्वं सहकारीवं खाजगी दूध उत्पादक संस्था मुंबईलां हवा तेवढा दूध परवठा करू शकत नाहीत. राज्यात दुधाचा खूप मोठा तुटवडा आहे. म्हणूनं बाहेरील राज्यातून दूध आयात करावे लागतं आहे.
दूध महाराष्ट्राचं आणि नफा गुजराथला
अमूल गुजराथ आणि मदर दिल्ली या संस्थाही मुंबईत दूध विकून मोठा नफा मिळवीत आहेत. मग महानंदाचं का तोट्यात आहे? त्यासाठी काही प्रशासकीय बदल करायचे असतील तें करा, कुठे कांय भ्रष्टाचार चालत असेल तर तो कठोरपणे मोडून काढा. पण इतर राज्याला महानंदा सारखा मोठा व्यवसाय दान करणे ही आत्मघातकी चूक आहे. दळभद्री पणा, अदूरदर्शी पणा आहे. परवा मोदी साहेबांनी काशीत अमूलचं केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. कुठून आणणार दूध. महाराष्ट्राचंचं, महानंदाचच दूध तिकडे जाईल. म्हणजे दूध महाराष्ट्राचं आणि नफा गुजराथला!
महाग तुप म्हणून खान्देशी तुपाला भाव
आजही खांदेशात अमूल ही दूध संस्था शेतकऱ्यां कडून चढ्या भावाने दूध खरेदी करून नेते आणि तेच दूध गुजराथ मार्गे अमूल ब्रँडच्या नावे पुन्हा मुंबईत आणून विकते. हे महानंदालां का जमत नाही? ईच्छा शक्ती नाही. मुंबईत आजही खान्देशी तुप आणि लोणी ईतरापेक्षा जास्त भावात विकले जाते. दादरला सर्वात मोठा आणि जुना दूध विक्रेता आहे सामंत डेअरी. तिथे तुम्ही जा आणि भाव फलक बघा. सर्वात जास्त महाग तुप म्हणून खान्देशी तुपाला भाव असतो. त्याखाली बेळगाव तुप आणि मग ईतर.
खान्देशी दुधाची प्रत उच्चं
खान्देशी दुधाची प्रत उच्चं असतें. त्यामुळे दुधाचे ईतर पदार्थही उच्चं प्रतीचे असतात. इथला चारा पाणी आणि हवामानाचा तो प्रभाव आहे. खांदेशात प्रत्येक्ष श्रीकृष्णाच्या काळा पासून अहिर गवळ्यानी पशुपालनातून हां व्यवसाय सुरु केला आहे. त्याचं ब्रॅण्डिंग खान्देशी लोक करत नाहीत. म्हणून आपल्या या व्यवसायाच मातेर झालं आहे. खान्देशी रयतेने याचा नक्की विचार करावा.
सांगली भागातील सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते आहेत. तें त्यांच्या भागातील नेत्यांशी जेंव्हा स्पर्धा करू शकत नव्हते, तेंव्हा तें खान्देशांतील धुळे नंदुरबार जिल्ह्यात आले. इथे त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरु कुरुनं नावारूपाला आणला. त्यातून नावं कमावून पुढे तें मंत्रिही झाले. हे खान्देशी माणसाला का जमत नाही? कल्पकता शून्य लोक आहेत आपलें. काम करायची, वेगळं काही करून दाखविण्याची दानत जिद्दच नाही.
दुधाचा व्यवसाय सतत प्रवाही व्यवसाय
तर माझ्या आजच्या लेखाचा मुख्य मुद्दा असा कीं, दुधाचा व्यवसाय सतत प्रवाही व्यवसाय आहे. त्याला कधीही कुठेही मरण नाही. दुधाला दुसरा पर्याय नाहीच. थोडा कष्टाचा असला तरी मोठा रोजगार आणि पैसा मिळवून देणारा व्यवसाय आहे. अमूल डेअरी हे याच उत्तम उदाहरणं आहे. तीच अनुकरण करून महानंदा डेअरी नफ्यात आणा. तें जमत नसेल तर महानंदा गोकुळलां द्या. त्यात फार मोठ नुकसान नाही.
वाटीतील थाटीत पडेल पण जमिनीवर सांडणार नाही. अमूललां देऊ नका. याचा विचार सरकारनें करावा. मोदी चांगले पंतप्रधान आहेत. मलाही तें आवडतात. पण म्हणून त्यांना खुश करण्यासाठी कांय वाटेल तें करू नका. त्यांच्या चांगला कामावर प्रकाश टाकण्यासाठी आपलें घर जाळून उजेड करू नका.
मराठी पशु पाळतय आणि गुजराथी दूध काढतय
हां लेख राज्यभर फॉरवर्ड करा. महाराष्ट्राच्या घराघरात लेख जाऊ द्या त्यातून झालं सरकार जाग तर बरंच आहे. नाहीतर सुरु आहे मग आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात ही म्हण खरी ठरेल. त्यात थोडा बदल होईल, मराठी पशु पाळतय आणि गुजराथी दूध काढतय!
अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा
राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?
खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

