राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मूळजी जेठा कॉलेज च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात विविध स्पर्धांचे आयोजन

“मूळजी जेठा कॉलेज जळगाव च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन”

दि.०४/०३/२०२४ रोजी जळगाव येथील के.सी.ई.सोसायटीचे, मूळजी जेठा महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात मायक्रोबायोम फूड फेस्टिवल, मायक्रोबायोम पॉट आर्ट स्पर्धा व प्रश्नमंजुषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या विविध स्पर्धांमध्ये जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.राष्ट्रीय विज्ञान दिन

कार्यक्रमाचे उद्घाटन

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. उज्वला भिरूड यांनी केले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दल रुची निर्माण होऊन जनजागृती साठी अशा स्पर्धांची गरज असते असे मत व्यक्त करत डाॅ.भिरुड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयात उपलब्ध संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आश्वासन यावेळी डॉ. भिरूड यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मूळजी जेठा कॉलेज च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात विविध स्पर्धांचे आयोजन
सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचे विद्यार्थी

सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात विविध स्पर्धां

मायक्रोबायोम फूड फेस्टिवल

सकाळी १० वाजता मायक्रोबायोम फूड फेस्टिवल ला आरंभ झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी किण्वन (फरमेन्टेड) झालेल्या पदार्थांचे सादरीकरण करून त्याबद्दल माहिती दिली. यादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध पदार्थांच्या मेजवानीचा आनंद लुटला.

सदर स्पर्धेत रोशनी परदेशी, शिवानी ठाकूर, सुनैना वाघ, वैष्णवी पाटील, साक्षी पाटील यांच्या संघाने प्रथम, पल्लवी काळे, साक्षी साठे, रोहिणी खडसे, रोहिणी बारी, मोहिनी मिस्त्री यांनी द्वितीय तर प्रज्ञा सुरळकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

मायक्रोबायोम पॉट आर्ट

मायक्रोबायोम पॉट आर्ट  ही विशेष स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी दुपारी १ ते २ असा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेत मातीच्या भांड्यावर सूक्ष्मजीवशास्त्राशी व जैवतंत्रज्ञानाशी संबंधित कला रेखाटायच्या होत्या.

या  स्पर्धेत बी.एस्सी.मधून हेमांगी जाधव यांनी प्रथम, पूजा माळी यांनी द्वितीय तर प्राची पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. एम.एस्सी. मध्ये प्रांजल खराटे प्रथम, रोहिणी खडसे द्वितीय तर दक्षता जाधव तृतीय आल्या.

प्रश्नमंजुषा

कार्यक्रमाची अंतिम स्पर्धा म्हणजेच प्रश्नमंजुषा दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडली. ही स्पर्धा प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत एकूण २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या सर्धेत प्रथम वर्षात भाग्यश्री बाविस्कर व विशाखा सोनवणे यांनी प्रथम, प्रतिक ठोंबरे याने द्वितीय तर दिपाली पाटील व पूजा माळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्षात करिष्मा दर्डा, निखील राणा यांनी प्रथम, निलेश कांबळे, यश पाटील यांनी द्वितीय तर ऐश्वर्या मोरे, श्रुती बनैत यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर तृतीय वर्षात कु.किरण पाटील, तनुजा पाटील यांनी प्रथम, अथर्व मुंडले, जयेश चौधरी यांनी द्वितीय तर अनिकेत देवळे, तेजल अत्तरदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे आयोजक व समन्वय

स्पर्धेचे आयोजनाचे व समन्वयाचे काम प्रा. निशा जाधव यांनी केले. त्यांच्यासोबत एम.एस्सी. मधील विद्यार्थी चि.किरण पाटील, कु.केजश्री पाटील, कु.सुनैना वाघ, कु.रोहिणी परदेशी, कु.शिवानी ठाकूर व बी.एस्सी.मधील विद्यार्थी चि.श्रेयश मोरे, कु. किरण पाटील व चि.अथर्व मुंडले यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी प्रा.देवेश्री सोनवणे, प्रा.गौरी वळवी, डॉ. संगीता चंद्रात्रे व प्रा. प्रसाद निकूमे यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख प्रा.डॉ. केतन नारखेडे, विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मूळजी जेठा कॉलेज च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात विविध स्पर्धांचे आयोजन 9
मायक्रोबायोम फूड फेस्टिवल

मूळजी जेठा कॉलेज जळगाव सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागा

मू.जे.च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

मू.जे. च्या सुक्षजीवशास्त्र विभागात अमेरिकेतील उच्च शिक्षण’ या विषयावर व्याख्यान

राष्ट्रीय मायक्रोबायोलिम्पियाड  स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड

मू.जे. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नेट सेट ची कार्यशाळा

Leave a Comment