राजकीय

राजकीय

फुकटचं खाण्यात चोरून खाण्यात जीं मज्या आहे ती कशातच नाही!


         एक कच्ची कैरी, एखादी चिंच यांची किंमत किती असतें? रुपया, दोन रुपये, पाच रुपये. एक ऊस फार फार तर 10 रुपये. एवढी किंमत मोजून या गोष्टी आपण हव्या तेवढ्या विकत घेऊन खाऊ शकतो. पण त्यात हवी तशी मजा येत नाही. पण जेंव्हा आपण रस्त्याने जाता जाता शेतकऱ्यांच्या शेतातून एखादी कैरी चोरून खातो, किंवा मक्याच कणीस वा गाजर चोरून खाण्यात खूप मजा वाटते. कारण तें फुकटचं खाण असतें. आणि फुकट विष मिळालं तरी लोक खातील.


          हे आठवायचं कारण म्हणजे विदेशात लपविलेले काळे धनं आणून प्रत्येकाच्या खात्यावर मोदी 15 लाख जमा करणार होते. तें पंतप्रधान होऊन आता 10 वर्षे झाली पण तें 15 लाख कांय आपल्या खात्यात जमा झाले नाहीत. याच असह्य दुःख एवढं मोठं आहे कीं, काही लोक तें सहन करू शकत नाहीत. तस तर या 10 वर्षात मोदीने आपल्याला खूप काही दिलं आहे. 15 लाख रुपयांच्या हजारो पटीने दिलं आहे. पण तें सर्वं या 15 लाखा पुढे काहीच नाही. कारण 15 लाख ही फुकटची कमाई आहे. आणि फुकट मिळालेल्या गोष्टी पेक्षा मोठं जगात काहीच नसतं.

निवडणूका लोकशाहीचा उत्सव


फुकट खाणार तरच ढेकर येणार


           मोदींनी काश्मीच कलम नं 370/35 अ हटवून काश्मीर सारखं नंदनवन भारतात विलीन करून दिलं. तिथले पत्थरबाजाचा बंदोबस्त केला. भारतीय संसद नव्याने उभारली, भारत मंडपम उभारलं.  राम मंदिर उभ केलं. काशीनाथ मंदिर कॅरिडोर उभारून तिथे अहिल्यादेवी होळकराचा पूर्णाकृती पुतळा उभारला. बालाकोटं सर्जिकल स्ट्राईक केला, अभिनंदनला सन्मानाने परत आणला, दिमाखदार G20 भरवलं, तीन तलाक बंद केला, समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

स्त्रियाना लोकसभा विधानसभा यात 33% आरक्षण दिलं. कोरोना काळात 80 कोटी जनतेला दोन वर्षे फुकट धान्य पुरवील, 140 कोटी जनतेला कोविडचे 3/3 लसीचे डोस फुकट दिले. ईतर गरीब देशानाही लस पुरविली. चंद्रावर चांद्रयान पाठवील, भारताची अर्थ व्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर नेली.

निवडणूका लोकशाहीचा उत्सव
निवडणूका लोकशाहीचा उत्सव

कार विक्रीत भारत तिसऱ्या क्रमांकावर नेला. गरीब महिलांना उज्वला गॅस दिला, शेतकऱ्यांना आपत्ती काळात वेळोवेळी रोख रकमेंत अनुदान दिले. राज्यात 15 लाख गरिबाना पक्की घर मोफत दिली. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. स्वछ पिण्याच पाणी, शेती सिंचन, उद्योग धंदे यासाठी विक्रमी जलसाठे उभारले. अजून बरंच काही केलं.

हे जरी खरं असलं तरी, लोभी आणि आंधळे विरोधक यांच्या डोक्यातील 15 लाख काही जातं नाहीत. राम नाम तुम्ही जपावा पाराया माल आम्हाला सोपवावा. त्याची पाहिली खेप लवकर द्या म्हणून ओरडणारे कधीच शांत बसणार नाहीत. तें विरोधासाठी विरोध करतच राहणार. त्यांना सोन खरेदी करून दिलं तरी तें आल्यूमिनियम का नाही दिलं म्हणून भांडणार. नावडतीच मीठ आळणी अशातील हां प्रकार आहे.

भाजप मधील खान्देशी नेते
भाजप मधील खान्देशी नेते


        यांचं 12 वर्षे शेपूट पाईपात ठेवून वाकडं तें वाकडंचं राहणार हे ठरलच आहे.  अशा परिस्थिती हे शेवट पाईपात घालून सरळ कारण्याच्या नादी नं लागता या जन्मजात वाकड्या शेपटाचा वापर, पाईप वाकविण्यासाठी केला तर टाकाऊतून टीकाऊचीं नवं निर्मिती करण्याचा आनंद मिळविता येईल.


        या फुकट खाऊ वृत्तीतूनचं पाकिटमारी जन्माला आली. यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म झाला. आणि नाक्या नाक्यावर लाच खाऊ अधिकारी आणि भ्रष्टाचारी पुढारी यांचा सूळ सुळात झाला. सरांईत पाकिटमार दिवसाला चार पाचसे रुपयांची कमाई करतो. पण आता ऑनलाईन पेमेंट होतं असल्यामुळे कोणी खिशात पाकिट वा पाकिटात पैसा ठेवतच नाही. म्हणून मग पाकिट माराचा व्यवसाय घाट्यात सुरु आहे. पण दुसरी कडे नेत्यांचा भ्रष्टाचार मात्र तेजीत आला आहे.

या घाट्यात जाणाऱ्यां पाकीट मारानी आता पोटा पाण्यासाठी राजकारणाच्या धंद्यात उतरायला हवं. पाकिट मारीत खूप धोका असतो. पकडाला गेला तर लोक भयंकर बदडतात. नंतर पोलीस बदडतात. नंतर तुरुंगवास, समाजात बदनामी. आणि कमाई अगदीच तुटपुंजी. त्यापेक्षा राजकारण चांगलं. मान सन्मान, मानधन, भत्ते, पेन्शन वर करोडोचीं काळी कमाई.

नार पार हा प्रकल्प खान्देशात आणायचा तर
नदी संवर्धन

फुकटचे 15 लाख रुपये हवे असतील तर


        आपण दूरदर्शन वर नेहमी बघत असतो नेत्यान्च्या घरात सापडलेले नोटांचे ढीग. परवा झारखंड मध्ये एका मंत्र्याच्या पी एस च्या घरात 30/35 कोटी रुपयांचं घाबड मिळालं. या पी एस चा पगार फक्त 15 हजार रुपये महिना आणि घरात नोटांचे ढीग. त्या आधी एका पुढऱ्याच्या घरात 300 कोटी मिळाले होते. म्हणून या 15 लाखावर डोळा ठेवून बसलेल्या पुढऱ्यांना मला सुचवयचं आहे कीं, केवळ राजकीय टीका करण्यासाठी तुम्ही या 15 लाखाचा वापर करत असाल तर हरकत नाही.

पण जर तुम्हाला खरंच फुकटचे 15 लाख रुपये हवे असतील तर आता भ्रष्टाचारात सक्रिय व्हा. तुम्ही राजकारणात तर आहातच आता एखाद्या चांगल्या मंत्र्या कडून भ्रष्टाचाराची दिक्षा घ्या आणि फुकटच्या 15 लाखाच्या जागी फुकट 15 कोटी कमवा. सवय झाल्यावर 1500 कोटी सुद्धा कमवाल.


       अशा प्रकारे कमाई करणारे खूप मोठे मोठे नेते आहेत. दिल्लीचे उपमुख्य मंत्री मनीष सिसोदीया यांना उपमुख्यमंत्री पदावर असताना अटक झाली. अजून जामीन मिळत नाही. हे तर काहीच नाही. लालूप्रसाद यादव, अरुण केजरिवाल आणि हेमंत सोरेन यांना तर मुख्यमंत्री पदावर असताना अटक झाली. त्यांना सुद्धा जामीन मिळत नाही. लालू चं वय झाल्यामुळे त्यांना आजार पणाचीं रजा देऊन जामीनवर सोडलं आहे.


         बाकी काहीही असलं तरी राजकारणातील भाष्टाचारा सारखा पैसे मिळवून देणारा किफायंती धंदा नाही. समजा भ्रष्टाचार उघड झालाचं तर 10/12 वर्षे तुरुंगवास, 60/70 लाख दंङ जो लालुना झाला. अहो 60/70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करून केवळ 10/12  वर्षाचा तुरुंगवास आणि 60/70 लाख दंड म्हणजे खूपचं फायद्यात असतात मंत्री. बघा करता आला तर!
        या लोकांवर राहत इंदौरी यांचा एक शेर आहे,


बनके इक हादसा बाजारमे आ जायेगा,
जो नही होगा वह अखबारमे आ जाएगा,
चोर उचक्कोकीं करो कद्र, कीं मालूम नही,
कौन कब कौनसी सरकार मे आ जाएगा.


बापू हटकर

नदी संवर्धन

भाजप मधील खान्देशी नेते

निवडणूका लोकशाहीचा उत्सव

राजकीय
राजकीय