मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

“मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” संपन्न”

आज दि.04 सप्टेंबर 2024 रोजी मू.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी एस.पी. फार्मासुटीकल्स, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. सुदीप राणे आणि महाविद्यालयातील ज्ञान संसाधन केंद्राचे (ज्ञानरंजन ग्रंथालय) संचालक डाॅ. व्ही.एस.कंची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत विभागप्रमुख प्रा.डॉ.के.पी. नारखेडे यांनी महाविद्यालय व विभागाची माहिती सांगत सर्व पालकांचे शब्दसुमनांनी स्वागत व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. श्री. सुदीप राणे यांनी आपल्या मनोगतात आपल्या महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.

आपले भविष्य उज्वल करायचे असल्यास आपण वाचन, विषयातील मुलभूत संज्ञा आणि प्रात्यक्षिके यांवर लक्ष केंद्रित करावे, असे संबोधित केले. यावेळी सुक्ष्मजीवशास्त्र विभागाला लाभलेली परंपरा व गुणवत्ता यावरही भाष्य केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डाॅ.कंची यांनी विद्यार्थ्यांसमोर आपण कसे विद्यार्थी असायला हवे, आपला वैचारिक विकास कसा करावा,  मानसिक स्थैर्य कसे गरजेचे आहे व वाचनाची गोडी कशी निर्माण करावी असे विविध विषय मांडत सर्व गुणवंतांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात प्रथम वर्षापासुन ते पदव्युत्तर च्या दुसर्‍या वर्षातील पहिल्या तीन मेरीट होल्डर चा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना एक पुस्तक, पेन, प्रमाणपत्र व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. एकुण 24 विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सत्कारानंतर सर्व पालकांनी विभागाला भेट दिली व चर्चा केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष एम.एस्सी.

च्या विद्यार्थिनी कु. साक्षी पाटील व कु.सुनैना वाघ यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन प्रा.श्रेया पांडे यांनी कार्य केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रसाद निकुमे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment