कवी दिलीप हिरामण पाटील यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

कवी दिलीप हिरामण पाटील यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचा सन्मान

आज दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी, मुंबईतील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी आणि न्यायप्रभात मासिक वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा अत्यंत प्रतिष्ठेने पार पडला.

या सोहळ्यात प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक, आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत विश्वगुरु मधूसुदन घाणेकर (पुणे) यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. घाणेकर यांनी देश-विदेशात ८,०४० एकपात्री प्रयोग सादर करून आपली वैश्विक ओळख निर्माण केली आहे.

या सोहळ्याला न्यायप्रभात मासिक वृत्तपत्र संस्थेचे ह.भ.प शिवाजी खैरे आणि ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प परशुराम महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.

कवी दिलीप हिरामण पाटील यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला

हा पुरस्कार मिळाल्याने मान्यवरांच्या आशिर्वाद आणि संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी मिळालेल्या या मान्यतेचा उल्लेखनीय गौरव झाला आहे.