चाळीसगाव : हॉटेल कमलशांती पॅलेस येथे रविवार, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) चाळीसगाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाला मा. आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
कार्यकारिणीत डॉ. प्रसन्न अहिरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सचिवपदी डॉ. केतन जी. वाघ यांची नियुक्ती झाली. कोषाध्यक्ष म्हणून डॉ. नितीन साळुंखे यांची निवड झाली असून, उपाध्यक्षपदी डॉ. समीर धाकड, सहसचिवपदी डॉ. सारंग पाटील, डॉ. स्वप्नील शिंदे व डॉ. प्रशांत धामणे यांची निवड करण्यात आली आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पाटील, डॉ. सोपान खर्चे, डॉ. योगेश पाटील व डॉ. विजय पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व आगामी कार्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी NIMA च्या चाळीसगाव शाखेच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली आणि आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी कार्यकारिणीने वचन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
