वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का? जिल्हाधिकारी साहेब आमचे नदी नाले सांभाळण्याची आणि संवर्धनाची जबाबदारी कोणाची आहे.? वाळूसाठी माफीयांनी नदी नाले ओरबाडले, भरभक्कम हायवा खाली माणसे चिरडले, एवढं सगळं घडत असताना यंत्रणेने डोळ्यावर छापड ओढले, जिल्हाधिकारी साहेब आपण ॲक्शन मोडवर या.
वाळूसाठी धुळे जिल्ह्यातील नदी नाले ओरबडणाऱ्या वाळू माफीयांच्याविरुद्ध सा. खान्देश सम्राट ने नेहमीच आवाज उठवलेला आहे. दरवर्षी शासनाच्या वतीने वाळूचा ठेका निघत असतो. ठेका घेणाऱ्याला वाळू उपशाची वेळ आणि वाळू उपसा प्रमाणाची मर्यादा शासनाने निश्चित करून दिलेली असते. परंतु वाळू माफीयांनी जिल्ह्यात अक्षरशः थैमान मांडलेले असल्याची प्रचिती पुन्हा आली. काल धुळे जिल्हा शिरपूर तालुक्यातील अर्थे या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला मालतीबाई शिरसाठ यांचा जागीच मृत्यू झाला. आणि संतप्त नागरिकांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर देखील पेटवून दिला. यापूर्वी देखील वाळूने भरलेल्या वाहनांनी धुळे जिल्ह्यात रस्त्यावरील अनेक वाहनधारकांचा जीव घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.

याबाबत माध्यमांमध्ये कितीही चर्चा झाली तरी, संबंधित यंत्रणेने डोळ्यावर झापड ओढल्याचे देखील निदर्शनास येते. अवैधरित्या वाळू उपसा करणारे माफीया, आणि अति पैशाच्या लालसेने ठेका घेणारे मध्यरात्री नदी नाल्यात उतरतात, जेसीबी द्वारे, पोकलँड द्वारे, वाळूवर अक्षरशा तुटून पडतात, ओरबाड, ओरबाड, जितके ओरबाडता येईल तितके वाळूवर तुटून पडतात. “लूट सके तो लूट लो” या धर्तीवरच त्यांची मध्यरात्री ही लूट चालू असते. धुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांमध्ये आता तर वाळूचे प्रमाण देखील कमी होऊ लागले आहे. परंतु या वाळू माफियांनी आणि अति पैशाच्या लालसेपोटी ठेका घेणाऱ्यांनी मध्यरात्रीत वाळूवर दरोडा टाकण्याच्या प्रवृत्तीमुळे नदी नाल्यांचे खोलीकरण होऊ लागले आहे. याबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी वाहणारी बारमाही पांझरा नदी आता वर्षभरातनं अवघे बोटावर मोजण्या एवढे दोन-तीन महिनेच वाहत असते, नदी जर कोरडी पडली आणि त्यात जर वाळू असली तर वाळूत पाणी मुरलेले असते, यामुळे काठावर चरणारे गुरे ढोरे आणि शेती उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होत असतो. परंतु वाळू माफीयांच्या दहशतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालक हतबल देखील झालेले आहेत.
हे सर्व प्रकार महसूल यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असतो, हे सुज्ञण्यास सांगणे न लागे. रात्री पोलिसांची गस्त देखील असते महसूल विभागाची देखील ग्रस्त असते. यंत्रणा जर गस्तीवर असताना देखील दिवस-रात्र नदी नाले ओरबाडले जात असतील तर गस्तीवर असणारे पोलीस आणि महसूल अधिकारी हे वाळूच्या गोरख धंद्यात सहभागी आहेत हेच निदर्शनास येते. आणि हे असंच सुरू राहिलं तर नदी नाले ओरबाडून ओरबाडून अक्षरशा नदी नाल्यांना खोऱ्यांचीच रूप येणार आहे. काठावर जगणारे शेतकरी आणि पशुपालक यामुळे हतबल होतच राहणार आहे, वाळू माफियांच्या हायवा खाली, ट्रॅक्टर खाली, वाहनांखाली माणसं चिरडले जात राहणार आहेत, याला अटकाव करणार तरी कोण.? कारण संबंधित यंत्रणाच पैशाच्या लालसे पोटी भंगून गेलेली आहे, अधिकारी जेवढा पगार नाही तेवढा हप्ता स्वरूपात पैसा दिला जातो. असेच आता निदर्शनास येत आहे. याबाबत धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर साहेब यांनीच लक्ष घालावे, आणि धुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांचे संवर्धन करावे, निसर्गाचे देखील संवर्धन करावे, आणि माफियांच्या वाहनाखाली चिरडले जाणारे निष्पाप नागरिक वाचवावेत. अशी अपेक्षा आमची आहे. मागील दोन तीन वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या दरम्यान पांझरा नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन करत असताना अंदाज न आल्याने एक भावीक पाण्यात बुडून मृत्यू पावला होता. ज्या मोठ्या खड्ड्यात तो भावीक पडलेला होता, तो खड्डा वाळू माफियांनी अक्षरशः ओबडधोबडपणे जिथून वाळू उपसता येईल, जिथून खंदून काढता येत असेल, असा भला महाकाय खड्डा खणलेला होता.
आणि त्या मोठ्या खड्ड्याला एक छोट्या तलावातच रूप प्राप्त झालेलं होतं, आणि त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळेच सदरचा अपघात घडल्याचे देखील यंत्रणेच्या निदर्शनास आले होते. असे असताना देखील यंत्रणा नेमकी काय करते.? रात्री गस्तीवर असणारे पोलीस काय करतात? यंत्रणा ही नदी नाल्यांच्या संवर्धनासाठी आहे की माफियांच्या चांगभल्यासाठी आहे.? याचे उत्तर समस्त नागरिकांना कळलेलेच आहे, आणि यावर जर कठोरपणे अंकुश आणायचा असेल, तर आता दस्तूर खुद्द धुळे जिल्हात वाळुमाफिया रात्रीच गाडी खाली करत असतात त्यांचा पंटर गाडीचा पुढे असतो यालाच म्हणतात रात्रीस खेळ चाले. जिल्हाधिकारी साहेब आपणच आता हाती हंटर घ्यावा. अशी अपेक्षा आहे सामान्य जनतेची पण ही अपेक्षा असणार आहे..
खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे.