Operation Sindoor
ऑपरेशन सिंदूर ते फिल्ड मार्शल मुनीर: पाकिस्तानचं धाडस की धांदल?”
आमच्या वर्गात सुद्धा पाकिस्तान होता. तो 5 वेळा एसएससी नापास झालातरी त्याच्या बापाने पेढे वाटले.
मी काय म्हटलं ते नीट ऐका, त्याचा अर्थ नीट समजून घ्या. मी म्हटलं, आमच्या वर्गात सुद्धा एक पाकिस्तान होता. पाकिस्तानी नाही, संपूर्ण पाकिस्तानच एका मित्राच्या रूपाने आमच्या वर्गात होता. हिंदूच होता बर का! त्याच नांव हिरालाल (बदलेल नांव आहे). पण त्याला आम्ही हिऱ्याच म्हणायचो. यां हिऱ्याचा बाप एका नामांकित संस्थेत मॅनेजर पदावर कार्यरत होता. हा हिऱ्या 5 वेळा मॅट्रिक नापास झाला आणि त्याच्या बापाने 5 हीं वेळा पेढे वाटले. ती गंम्मत शेवटी सांगतो. मी जातं धर्म वगैरे काही पाळत नाही. आपण सर्व भारतीय आहोत असं मी मानतो. अमर, अकबर, ऍंथोनी सर्व भारत मातेची लेकरे आहेत, असं मी मानतो. असं असून सुद्धा मी वर सांगितलं कीं, माझा मित्र ज्याला मी पाकिस्तान संबोधलं तो हिंदूच होता.
असं म्हटलं याच कारण पहेलगाम हत्या कांडातील सैतानानी ज्यां 28 निष्पाप लोकांचे बळी घेतले त्यां प्रत्येकाला अतिरेक्यानी धर्म विचारला, हिंदू असल्याची खात्री करून गोळ्या घातल्या. हे जे धर्माच विष यां सैतानांच्या डोक्यात भरवलं होतं त्याची विषकुपी पाकिस्तानाचा लष्कर प्रमुख मौलाना असद मुनीर याच्या डोक्यात आहे. त्याने कामधंद्या निमित्त जगभर पसरलेले पाकिस्तानी एक दिवशी पाकिस्तानात एकत्र केले. त्यांना सांगितलं, हिंदू आणि मुस्लिम वेगळे आहेत. ते एकत्र नांदू शकत नाहीत. असं हिंदू धर्माच नांव घेऊन ओकाला. पुढे त्याने जिन्नाची टू नेशन थेरी सांगितली.तो पाकिस्तान मधील मुस्लिमां सोबत भारतातील मुस्लिमांनाही भडकवत होता. हिंदू मुस्लिम वेगळे आहेत. ते एकत्र राहू शकत नाहीत. त्याला कश्मिरी जनतेलाहीं सांगायचे होते कीं, भारत जम्मू काश्मीर मध्ये जे विकास कार्य करत आहे, रोजगार देत आहे, निवडणूका घेत आहेत, तुम्हाला शांती देत आहेत याला भुलून जाऊ नका. हिंदू विरुद्ध हिंसा करा. हा तो मेसेज होता. त्याची सुरवात त्यानेच पहेगाम मध्ये केली. 6/7 राक्षस पाठवून निरपराध 28 हिंदू मोजून मोजून मारले.
भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?
या दृष्क्रूत्याची भारताने व्याजासकट नाही तर दाम दसपट परत फेड केली. लष्कर-ए- तय्यबा, जैश-ए-मोहमद, हिजबूल मुजाहीद्दीन यांचे अड्डे जमीनदोस्त केले. 100 अतिरेक्यांचा खात्मा केला. 40 पाकिस्तानी सैनिक मारले. 9 हवाई तळ उध्वस्थ केले. भारतावर पाकिस्ताने सोडलेले सर्व मिसाईल हवेतच नष्ट केले. हजारो तुर्की ड्रोन हवेतच गारद केले. जे मिसाईल हवेत नष्ट झाले त्यांनी पाकिस्तानची आब्रू वाचवली. ते हवेत नष्ट झाले म्हणून त्यांची मारक क्षमता कळली नाही. त्यामुळे ते विनाशकारी कीं, फूस हे सांगता येत नाही. पण जे मिसाईल चुकून जमिनीवर कोसळले त्यांनी मात्र पाकिस्तानाची आब्रू घालविली. ती डॅम्बीस मिसाईल फुटलीच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची हत्यार म्हणजे चीनने पुरविलेले भंगार होते हे जगा समोर आल.
यात चीन पेक्षा हीं जास्त बेअब्रू तुर्कस्थान झाली. त्याने पाकिस्तानला दिलेले हजारो ड्रोन भारतीय सेनादलाने हवेतच गारद केले. तुर्कस्थान ने हे ड्रोन ऑपरेट करायला तुर्की सैनिक हीं पाठविले होते. त्यातील दोन सैनिक भारतीय सेनेने केलेल्या हल्यात मारले गेले. तुर्की अध्यक्ष एरदोगन हा अत्यंत हरामखोर माणूस निघाला. तुर्कस्थान मध्ये झालेल्या भयंकर विनाशकारी हल्यात सर्वात जास्त मदत भारताने केली होती. ते विसरून त्याने पाकिस्तानला धर्माच्या नावाने मदत केले. यां भामट्याला इस्लामी जगताचे खलिपा व्हायचे आहे. पाकिस्तान एवढा निर्लज्ज, लबाड आणि कोडगा देश जगात दुसरा नाही. ऑपेरेशन सिंदूर मध्ये यां देशाचे अतोनात नुकसान भारतीय लष्कऱाने केले. प्रचंड वित्तहानी, प्राणहानी झालेली सर्व जगाने पाहिलं. सॅटेलाईट माध्यमातून सर्व गोष्टी सर्वाना कळतात. पाकिस्तानचा पराभव सर्व जगाने पहिला तरी तिथले कोडगे राजकारणी आणि भित्रे सेनानी पाकिस्तानी जनतेला खोटं सांगतात. म्हणतात, आपण युद्ध जिंकलो. नुसतं सांगतही नाही तर विजय उत्सव साजरा करतात. त्यासाठी जागतिक बँकेकडून कर्जहीं काढतात. याला म्हणतात, ऋण काढून सण साजरा करणे. याही पुढे जाऊन यां देशाने कहर केला. युद्ध जिंकल्या बद्दल असीम मुनीरला फिल्ड मॉर्शल म्हणून सर्वोच्च लष्करी पुरस्कार देऊन टाकला.
कदाचित पंतप्रधान शहबाज शरीफ याला फिल्ड मॉर्शल काय असत हेच माहित नसावं. त्या वेड्याने पराभूत माणसाला फिल्ड मॉर्शल बनवून टाकलं. किंवा मग शहबाज शरीफ याने घाबरून असीम मुनीरला हा पुरस्कार देऊन टाकला असावा. पाकिस्तानात लष्कर हीच अंतिम सत्ता असतें. आपल्याला पंतप्रधान पदावरून मुनीरने हटवू नये म्हणून कदाचित हा पुरस्कार त्यांनी मुनीरला दिला असावा. असीम मुनीर याला फिल्ड मॉर्शल पदवी देणे म्हणजे गाढवावर अंबारी ठेवण्यासारखे आहे. सोन्याची अंबारी हत्तीच्या पाठीवर शोभून दिसते. गाढवाच्या पाठीवर नाही. गाढवावर गोणीच लादावी लागते. गाढवाच्या पाठीवर अंबारी ठेवली तर गाढवला हत्तीचं महत्व येत नाही. उलट अंबारीच महत्व कमी होऊन ती गोणी सारखी दिसायला लागते.
भित्र्या माणसाला फिल्ड मॉर्शल देत नाही. ऑपेरेशन सिंदूर सुरु व्हायच्या आधी मुनीरने सर्व कुटुंब कॅनडाला पाठवून दिलं आणि धुमश्चक्री सुरु झाल्यावर मुनीर सीज फायर होई पर्यंत कुठल्या तरी बंकर मध्ये लपून बसला होता. त्याला फिल्ड मॉर्शल कोण म्हणेल?
फिल्ड मार्शल म्हणजे राणांगणात अजिंक्य ठरलेला वीर सेनापती. फिल्ड मॉर्शल होते जनरल सॅम मणेका शॉ. त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फिल्ड मॉर्शल पदवी बहाल केली होती. जनरल माणेक शॉ यांच्या नेतृत्वा खाली भारतीय सैन्याने 1971 साली पाकिस्तान वर प्रचंड विजय मिळावीला होता. ज्यामुळे पाकिस्ताने दोन तुकडे झाले. नवा बंगला देश जन्माला आला. पाकिस्तानाचे 93 हजार सैनिक भारतीय सेनेने कैद केले. त्यांना फिल्ड मॉर्शल पदवी शोभून दिसत.
भारताने केलेल्या ऑपेरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानाला अक्षश: माती चारली. त्या देशाचे 4 तुकडे होण्याच्या मार्गांवर आहेत. नकाशावरून पाकिस्तान नांव पुसलं जाणार आहे. भारताने सिंधू जल करार रद्द केला आहे. ऑपेरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे कंबर्डे मोडले आहे. आणि यां अत्यंत नामुश्किच्या काळात मुनीर फिल्ड मॉर्शल घेत आहे. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर एकमेकांची स्तुती करत आहेत. यावर एक संस्कृत सुभाषित आहे,
उष्ट्रभस्य लग्नम् गर्दभ: स्तुती पाठक: l
परस्परम्च वदती अहो रूपम् अहो ध्वनी ll
अर्थ सरळ आहे, वाकड्या तिकड्या उंटाच्या लग्नात कर्कश आवाजाचा गाढव पुरोहित होता. गाढव म्हणतो, उंट वधू वऱानो अहाहा काय तुमचं रूप आहे. त्यावर उंट म्हणतो, आहाहा गाढव भडजी बुवा काय तुमचा मधुर आवाज आहे.
तशी हीं उंट गाढवाची पराभूत जोडी म्हणजे मुनीर-शहबाज जोडी आहे.
मुनीर- आहाहा असिफ भाई काय तुमचं सरकार आहे!
शहबाज-आहाहा मुनीर भाई काय तुमचं सैन्य आहे!
हाफिज/मसूद-वा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. शहबाज मियाँ कर दो मौलाना मुनीरको फिल्ड मॉर्शल.
पराभूत सेनापतीला फिल्ड मॉर्शल हे जगातील एकमेव उदाहरणं आहे.अनेक राजकीय भाष्यकार अनेक महिन्या पासून सांगत आहेत, पाकिस्तानात तख्खता पलट होईल. पण मला तसें वाटत नाही.माझं मत आहे. तख्खता पलट होणार नाही. कारण पाकिस्तानात जनतेची अत्यंत दैनिय अवस्था आहे. महागाई बेरोजगारी, उपासमारी यांनी आकाश गाठलं आहे. देश फुटीच्या उंभरठ्या वर उभा आहे. त्याचे 4 तुकडे होणार हे ठरले आहे. हीं परिस्थिती कोणीहीं बदलू शकत नाही. अशा परिस्थिती सत्ता हातात घेऊन अपयशाचे धनी होण्यापेक्षा, सरकार सोबत राहून जमेल तेवढा मलिदा कमावून विदेशात पळून जाणे हे कधीहीं फायद्याचे आहे. असा विचार सेना करत आहे. म्हणून अगदी इम्रान खान सत्तेवर असल्या पासून लष्करला परिस्थिती अनुकूल असून सुद्धा लष्कर सत्ता हातात घेत नाही. पुढेहीं घेणार नाही.
यां सर्व नौटंकीत आमच्या हिऱ्याचा काय संबंध. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याच असं झालं मित्रानो, हिऱ्या मॅट्रिकची परीक्षा पास होणार नाही याची 100% खात्री हिऱ्याला असल्यामुळे तो जेंव्हा जेंव्हा मॅट्रिकाच्या परीक्षेला बसायचा तेंव्हा तेंव्हा तो वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक त्याच्या बापाला द्यायचा. बाप सुद्धा कामाच्या अती व्यापामुळे कोणतीही शहानिशा न करता, हिऱ्याने दिलेला क्रमांक डायरीत लिहून घ्यायचा आणि निकाल लागल्यावर डायरीतील क्रमांक वृत्तपत्राशी जुळवून मुलगा मॅट्रिक पास झाला म्हणून लोकांना पेढे वाटायचा. असं 5 वेळा झालं आणि मग हिऱ्यानेच मॅट्रिकचा नाद सोडून दिला. पुढे हिऱ्याचा बाप स्वाभिमानाने लोकांना सांगायला लागला माझा मुलगा नॉन मॅट्रिक पास आहे म्हणून!
Operation Sindoor by Artical बापू हटकर
1 thought on “Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर ते फिल्ड मार्शल मुनीर पाकिस्तानचं धाडस की धांदल?”