पायी पंढरपूर दिंडीचे आयोजन
सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी चाळीसगाव तर्फे पायी पंढरपूर दिंडीचे आयोजन
प्रतिनिधी चाळीसगाव
येथील सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी मोठ्या उत्साहात दिनांक ११/६/२०२५बुधवार रोजी निघणार आहे या पायी दिंडी सोहळ्यात गेल्या ३३ वर्षांची परंपरा असून गेल्या वर्षी या पाई वारीत १५०० हून अधिक वारकरी सहभागी झाले होते .यंदाही पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून त्या भाविकांना दिंडीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी दिनांक १०जून २०२५ मंगळवार बेलदार वाडी सिद्धेश्वर आश्रम येण्याची करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तावनाचे कीर्तन सकाळी ८ ते १० या वेळेत ह भ प कैलास महाराज वाडेकर यांचे होणार आहे वै.संत निवृत्ती महाराज तुसे यांच्या कृपाशीर्वादाने व ह. भ.प.ज्ञानेश्वर माऊली यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वर्ष १९८८ पासून या पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली तेव्हापासून ३२ वर्षांपासून हा सोहळा उत्साहात व भक्तीभावात सुरू आहे भाविकांच्या उदार दातृत्वामुळे दिवसेंदिवस सोहळ्याचे स्वरूप वाढत आहे .

मागील वर्षी पंधराशे पेक्षाअधिक वारकरी या सोहळ्यास सहभागी झाले होते त्यात महिंदळे येथील दिंडी गारखेडे येथील दिंडी व तामसवाडी येथील दिंडीचा सहभाग आवर्जून असतो. या भाविकांना दिंडीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी १० जून २०२५ मंगळवार रोजी बेलदारवाडी येथे येण्याची करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉक्टर ,औषधी , शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .दिंडी सोबत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचे ट्रँकर,डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका, औषध पथक,पिण्याचे जार चे शुद्ध पाणी पाणीपुरवठा ,अंथरून पांघरुण वाहून नेण्यासाठी मोठ्या वाहनांची व्यवस्था आहे. दोन वेळेस चहा नाश्ता दोन वेळेस स्वादिष्ट रुचकर भोजन असते . दिंडीत, भारुडे ,गवळणी, प्रवचन कीर्तन असे अनेक कार्यक्रम असतात
वारकरी भाविकांनी भक्तीचा आनंद लुटावा पाई वारीचे ३२ वर्षे पूर्ण झाले असून यंदाचे ३३ वे वर्ष आहे ११ जून २०२५ बुधवारी सकाळी वारी भूवैकुंठ पंढरपूरकडे प्रस्थान करेल यात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
ह. भ.प. ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी
१९ दिवसात ४०० किलोमीटर चा प्रवास करणार
दिंडी दिनांक ३०/०६/२०२५सोमवार पंढरपूर येथे पोहोचणार आहे यात रोजचा २५ किलोमीटरचा प्रवास आहे यावर्षी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनातून सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी ते भूवैकुंठ पंढरपूर सुमारे चारशे किलोमीटर पायी वारीचे 19 दिवसांचे असे नियोजन आहे.

प्रवास १९ दिवसात दिंडी करणार आहे .पाई वारीला येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सोबत बॅटरी ,लाकडी काठी, पिण्याच्या पाण्याची बाटली घोंगडी अथवा रेनकोट हे साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे.
शिंगणापूर अहमदनगर करमाळा मार्गे ३०/०६/२०२५ला पोचणार आहे दिंडी
ही दिंडी शिस्तप्रिय दिंडी असा नावलौकिक प्राप्त आहे तसेच व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सतत प्रयत्नशील असतात .
प्रस्तानाचे कीर्तन दिनांक ३०/०६/२०२५ सकाळी होऊन पायी दिंडी सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी येथून भूवैकुंठ पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे नालेगाव लासुर स्टेशन गंगापूर प्रवरासंगम नेवासा वडाळा शनि शिंगणापूर अहमदनगर मिरजगाव बाभूळगाव जातेगाव करमाळा जेऊर टेंभुर्णी काळे वस्ती करकंब वीट भट्टी मार्गे पंढरपूर येथे पोहोचेल रोज २५ किलोमीटर पायी प्रवास असेल.
टीप दिनांक ०१/०७/२०२५ ते ६/७/२०२५ सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी येथे ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या भाविकांना पारायणाला बसावयाचे आहे त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रत सोबत आणावी.
Сбор качественных хрумер ссылки помогает повысить видимость сайта и улучшить его позиции в поиске.
Ужасы на сайте — для тех, кто любит пощекотать нервы.
https://blogs.arzuka.com/ruseriya-14j/
AI memecoin launcher empowers creators worldwide
https://toxicmonster.net/groups/memecoin-trading-and-viral-marketing/