जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित
२८ डिसेंबर २०२३ रोजी कल्याण येथे अहिराणी दिनदर्शिकेचे विमोचन (प्रकाशन)मा.नगरसेवक श्री.उमेशजी बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.मा. नगरसेवक आदरणीय उमेशजी बोरगावकर यांनी विमोचनप्रसंगी आहिराणी भाषेची श्रीमंती, महती आणि महिमा किती उच्च दर्जाचा आहे ते विषद केलं.आहिराणी भाषेचा गोडवाच एकमेकांना जोडतो.आहिराणी भाषेममुळेच माझ्या व्यवसायाची भरभराट झाली असं मनोगतातून व्यक्त केल.
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फे दरवर्षी अहिराणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते.
आहिराणी भाषा ही भाषांची राणी आहे. सुमारे २ कोटी लोकांची बोलीभाषा आहे.अहिराणी भाषेचं व संस्कृतीचं संवर्धन,संरक्षण व संक्रमण करणं हेच खान्देशी बांधवांचं नैतीक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आहिराणी दिनदर्शिका प्रकाशन हा एक सुंदर आणि स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन श्री.ए.जी.पाटील यांनी केले.
अहिराणी दिनदर्शीका मोफत वितरन
दरवर्षी आपण १०,००० अहिराणी दिनदर्शीका मोफत वितरीत करतो.या वर्षी अहिराणी दिनदर्शीका प्रकाशनाची सुरुवात छत्रपती संभाजी नगर येथे केली असून हे विमोचन कल्याण शहरात करीत आहोत.
आहिराणी दिनदर्शिका ही रंगीत,आकर्षक व सुबक बांधणीमुळे वाचनीय, संग्रहणीय झाली आहे.भाषा हे सुसंपर्काचं,सुसंवादाचं व सुविचारांचं प्रभावी माध्यम आहे.भाषा व खान्देशच्या सर्व उपक्रमांना वाढवण्यासाठी आम्हाला तन,मन,धनाने मदत करण्याचे आवाहन विकास पाटील यांनी उपस्थितांना केले.
प्राचार्य श्री.एन.एम.भामरे यांनी खुमासदार व ओघवत सूत्रसंचालन केले आणि उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर जल परिषद करत असलेल्या कार्याचा व भविष्यकालीन योजनांचा आढावा विशद केला.
श्री.सुनिल भाऊ चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले तर श्री एल .आर.पाटील यांनी बोधात्मक कथेद्वारे संघटनेच्या कामास शुभेच्छा दिल्या.विनोद शेलकर व प्रा.प्रकाश माळी यांनी आहिराणी दिनदर्शिका निर्मितीसाठी योगदान देणा-यांचे आभार मानले.प्रकाश पाटील यांनी आहिराणी दिनदर्शिका घरांघरांत कशी पोहोचेल याविषयी सखोल मार्गदर्शन केलं जगदिश पाटील यांनी शाळांशाळांमध्ये पोहचविण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.शरद शिंदे व श्री.विसपूते यांनी आहिराणी दिनदर्शिका ही संपुर्णपणे आहिराणी भाषेतच प्रकाशित केली तर आपला उद्देश शंभर टक्के सफल होईल असं सुचविलं.
या प्रसंगी विविध ज्ञाती समाज मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फुर्त उपस्थिती होती.अशाप्रकारे दिमाखदार व शानदार कार्यक्रमाची सांगता झाली
1 thought on “जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न”