अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन

अहिराणी दिनदर्शिकेचे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.व्ही एल .माहेश्वरी यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन

शिरपूर जागतिक अहिराणी संवर्धन परिषदेने अहिराणीच्या संरक्षण व संवर्धनाच्या भूमिकेतून मागील वर्षापासून अहिराणी दिनदर्शिका हा उपक्रम प्रारंभ केला आहे . या अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम वरिष्ठ व डॉक्टर पां .रा .घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाचे मा .प्राचार्य प्रो. एस एस राजपूत उपप्राचार्य डॉ . फुला बागुल डॉ .एस पी महिरे प्रा .विलास चव्हाण पर्यवेक्षक प्रा . आर के पाटील ओएस श्री संजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .

याच दिनदर्शिकेचे प्रकाशन जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा . व्ही एल .माहेश्वरी प्रो व्हाईस चान्सलर प्रा . एस .टी .इंगळे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा . एस एस राजपूत कला शाखेचे अधिष्ठाता प्रा .जगदीश पाटील वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्रा .अनिल डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन कक्षात करण्यात आले .

याप्रसंगी जागतिक अहिराणी परिषदेचे भाषा प्रमुख डॉ . फुला बागुल व विविध मान्यवर उपस्थित होते .

Leave a Comment