आ बं मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक के एन तडवी सर सेवानिवृत्ती

आ बं मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक के, एन, तडवी सर सेवानिवृत्ती

आ,बं, मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक के, एन, तडवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

चाळीसगाव 31 मे


आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक के. एन, तडवी सर आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा विशेष सत्कार चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅने, बोर्ड व्हा. चेअरमन तथा मुलांचे हायस्कुलचे चेअरमन मा, योगेशभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल म्हणाले की, अश्या शिस्तप्रिय मुख्याध्यापकाची शाळेला खरचं गरज असते, तडवी सरांनी शाळेसाठी, शाळेच्या भरभराटीसाठी केलेले काम म्हणजे त्यांच्या पदाला त्यांनी न्याय दिला. सेवानिवृत्ती नन्तर देखील आम्हाला त्यांचे मार्गदर्शनाची गरज पडेल त्यावेळी आमच्या हाकेला ते ओ देतील ही खात्री आहे.

मुख्याध्यापक तडवी सर यांनी सत्काराला उत्तर देताना,,संस्थेने व भाऊंनी माझेवर टाकलेली जबाबदारी मी समर्थपणे पैलू शकलो याचा मला अभिमान वाटतो, मी स्वतः शिस्त व वेळेला महत्व दिले त्यामुळे मी इतरांना बोलू शकलो हे सांगताना  त्यांनी काही अनुभव देखील सांगितले.

आ बं मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक के एन तडवी सर सेवानिवृत्ती 3

कार्यक्रमाचे संयोजक जेष्ठ शिक्षक मनोहर सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडताना, तडवी सरांचा प्रत्येक गोष्टीचा असलेला बारीक अभ्यास, नियोजन, शिस्त, तसेच कामाची पद्धत याविषयी सविस्तर सांगितले.

यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक बाबा सोनवणे सर, पर्यवेक्षक मिलिंद कुलकर्णी सर,  कार्यालयीन प्रमुख निरंजन लद्दे, मुलींच्या शाळेचे मा.उपमुख्याध्यापक पी, डी, येवले सर,जेष्ठ शिक्षक शरद जाधव सर, महेंद्र कुमावत सर, जयदीप गांगुर्डे सर, कलाशिक्षक चेतन कुऱ्हाडे सर, डी, के, चव्हाण सर, प्रयोगशाळा सहाय्यक बाबा ठाकूर, दिलीप चौधरी, गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आभार पर्यवेक्षक मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Comment