महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा
स्वो.वि.संस्थेचे, आर.डी.एम.पी. हायस्कूल, दोंडाईचा येथे दि. 11/03/2025 मंगळवार रोजी खान्देश गौरव महाराजा सयाजीराव गायकवाड ( बडोदा संस्थान) यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आर. डी. एम.पी.हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री एस.के.चंदने होते. उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.पाटील मॅडम व पर्यवेक्षक श्री भारत सिसोदिया,श्री भरतरी ठाकुर, श्रीम रीना गिरासे ,येशी, कविता पाटिल उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, पुष्पहार, श्रीफळ अर्पण करून करण्यात आली.सदरहू कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि निमित्ताने मा.कवी श्री भीमलिंग लिंभारे, दोंडाईचा व कवयित्री सौ. कुसुमताई चौधरी यांना काव्य वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कवी श्री भीमलिंग लिंभारे व सौ कुसुमताई चौधरी यांनी आपल्या स्वरचित मराठी कविता सादर केल्या.
ज्येष्ठ शिक्षिका व साहित्यिका श्रीमती लतिका चौधरी यांनी सदरहू कार्यक्रमाचे आयोजन करून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच भाषाविषयक अशा विविधांगी कार्याची ओळख करून देऊन अहिराणी काव्यरचना सादर केली. सदरहू कार्यक्रमात हेमराज पवार, जयेश भरवाड, गौतमी नगराळे, सोनाली तिरमली या विद्यार्थ्यांनी अहिराणी कविता सादर केल्या. कार्यक्रमात सहभाग नोंदवल्या निमित्ताने श्रीमती लतिका चौधरी मॅडम यांनी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचा अहिराणी काव्यसंग्रह भेटस्वरूप दिला. कार्यक्रमाचे फलक लेखन श्री डी.के. सोनवणे सर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक श्री जे. एच. गिरासे यांनी केले. पर्यवेक्षक श्री भारत सिसोदिया सर यांनी त्यांचे विचार व्यक्त केले व प्राचार्य श्री चंदने सर यांनी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करून काही अहिराणी गाणी सादर केली. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.