महिला दिनानिमित्त कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार वितरण ग्लॅम राईज फॅशन शोचे आयोजन

कस्तुरी राईज फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार वितरण ग्लॅम राईज फॅशन शोचे भव्यदिव्य आयोजन

सौ. विजया सुरेश मानमोडे संकल्पना

कस्तुरी राईज फाउंडेशनच्या संचालिका सौ. विजया सुरेश मानमोडे यांच्या संकल्पनेतून नारी सन्मान सोबत नारी शक्तीच्या कलागुणांना चालना प्राप्त होऊन त्यांचा सन्मान व्हावा यासाठी पुण्यनगरी निगडी येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे ५ मार्च २०२४ रोजी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष नारींचा कस्तुरी नारीशक्ती पुरस्कार देऊन शाल स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार

महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी बरोबर आता ग्लॅम राईज फॅशनची सुरवात

महाराष्ट्रात सर्वप्रथम महाराष्ट्रातील संस्कृती संवर्धनासाठी नारींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी महासोहळ्याच्या यशस्वीतेनंतर ग्लॅम राईज फॅशन शोचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. यात अनेक फॅशन डिझायनर, मॉडेल यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता. स्पर्धकांनी स्वतःच डिझाईन केलेले आकर्षक पेहेरावसह बहारदार पदसंचलन केले.

प्रमुख पाहुणे

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय  तुषार हिंगे, मा.समीर दीक्षित, मा. चंद्रकांत विसपुते , डॉ. जयश्री ठाकरे , प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, लेफ्ट. डॉ. जितेंद्र देसले, मा. उज्वला चौधरी, मा.दिग्विजय जोशी आणि मा. केतन महामुनी ह्या मान्यवरांची उपस्थिती होती.

जिजाऊ  प्रतिमेचे पूजन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष , आदर्श महिलांचा  “राज्यस्तरीय कस्तुरी नारीशक्ती पुरस्कार” उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

महिला दिनानिमित्त कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार बरोबर ग्लॅम फॅशन शोचे आयोजन

फॅशन क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेऊन करियर घडवणाऱ्या महिला मुलींसाठी आयोजित ग्लॅम फॅशन शोचे विविध फेऱ्या झाल्या. १५० फॅशन डिझायनर आणि मॉडेल्स सहभागी झाले होते . सर्व स्पर्धकांच्या विविध कलागुणांचे परीक्षण करून त्यातील विजेते निवडण्यात आले.

पुरस्कार विजेत्यांना 11 हजार, 8 हजार व 6 हजाराचे बक्षिसे , मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

परीक्षक म्हणून “मी” खादीचे डॉ. सचिन पाटील, सिद्धी गोहील (चित्रपट क्षेत्रातील फॅशन डिझायनर), मंजू सिंग (फॅशन डिझायनर) आणि स्मिता चव्हाण (उद्योजिका फॅशन आणि ब्युटी क्षेत्रातील) या मान्यवरांनी परीक्षण केले.


मेकअप पार्टनर म्हणून क्षमा धुमाळ यांचे क्लिओपात्रा स्टुडिओचे मेकअप आर्टिस्ट होते.


सर्व सहभागी स्पर्धकांपैकी


प्रथम विजेती सारिका कांबळे द्वितीय विजेती सायली चौधरी
तृतीय विजेती पूजा मोहिते आणि इतर वीस उत्कृष्ट पोशाख बनवलेले स्पर्धकांची उत्तेजनार्थ म्हणून  बक्षीस प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आयोजक

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश मानमोडे, अभिजित मानमोडे,  हर्षदा गायकवाड,  पुनम भदाणे, देवेश पाटील, निखिल भदाणे, सौरभ साठे यांचे योगदान लाभले.

वृत्त:- लेफ्टनंट प्रा.डॉ. जितेंद्र देसले

महिला दिवस स्त्री शक्तीचा जागर

नारी मुक्ती की ओर महिला दिन लेख विशेष
लेखीका:-डॉ. निर्मला पाटील.
राष्ट्रीय अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

2 thoughts on “महिला दिनानिमित्त कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार वितरण ग्लॅम राईज फॅशन शोचे आयोजन”

Leave a Comment