उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर…

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर.

(प्रतिनिधी ):- उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दरवर्षी अहिराणी भाषेचे संवर्धन करणाऱ्या अहिराणीतील साहित्यिक, लेखक, कवी, स्तंभलेखक, विविध डिजिटल प्रणालीतील मान्यवर यांना दरवर्षी भाषेच्या सक्षमीकरण समृद्धी व संपन्नतेच्या कार्यासाठी जीवनगौरव व डॉ.दा.गो.बोरसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सोहळा २७ जुलै २०२५ रोजी ,कालिका मंदिर हॉल, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

अहिराणी भाषा संवर्धन परिषद

सन २०२५ चा जीवनगौरव पुरस्कार
सटाणा येथील ज्येष्ठ अहिरानी साहित्यिक डॉ. सुधीर देवरे यांना जाहीर झाला आहे.तर डॉ.दा.गो. बोरसे गौरव पुरस्कार- शकुंतला पाटील रोटवदकर (ह.मु. एरंडोल), भाग्यश्री पाटील (मुंबई), एन. एच. महाजन (शिरपूर),  युवराज माळी (जळगाव),  डॉ. सदाशिव सूर्यवंशी (धुळे),  डॉ. संजीव गिरासे (धुळे),  प्रा. विमल वाणी (म्हसावद), मोहन पाटील (गुजरात) यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे वितरण रविवार दि.13 जुलै रोजी नाशिक येथील कालिका मंदिर हॉल जुना आग्रा रोड येथे सकाळी 9.30 वाजता होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक लतिका चौधरी हे राहणार असून आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ शास्त्रज्ञ जगदीश देवरे उपस्थित राहणार आहेत.

अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर…

यावेळी लतिका चौधरी लिखित “वासलात” या पुस्तकाचे प्रकाशन देखील या संमेलनात होणार आहे.

या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कालच पुरस्कार समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीत पुरस्कारविजेते निश्चित करण्यात आले. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य विकास पाटील, जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील,  बापूसाहेब हटकर, अर्जुन पाटील आप्पा, प्रा. प्रकाश माळी, डॉ. नरेंद्र खैरनार, डॉ. फुला बागुल, सौ. लतिकाताई चौधरी, डॉ. एस. के. पाटील,  प्रमोद कुवर,  प्रा .विनायक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.  अहिराणी साहित्याचा गौरव करणाऱ्या या संमेलनाकडे आता संपूर्ण खानदेशाचे लक्ष लागले आहे.

तरी अहिराणी रसिक, प्रेक्षक, साहित्यिक व भाषा प्रेमी यांनी या सोहळ्यास व रिमझिम अहिराणी काव्य संमेलनास उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे, असे आवाहन अध्यक्ष विकास पाटील,  कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील,  सहकार्याध्यक्ष डॉक्टर एस के पाटील, बापू हटकर, पुरस्कार निवड समितीचे डॉ. फुला बागुल, डॉ. नरेंद्र खैरनार, प्रमोद कुवर, विनायक पवार, प्रा. प्रकाश माळी यांनी केले आहे.

Leave a Comment