जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न

१७ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे अहिराणी दिनदर्शिकेचे विमोचन (प्रकाशन) करण्यात आले.जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फे दरवर्षी अहिराणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते.अहिराणी भाषा व संस्कृती सनवर्धना करीता हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन विकास पाटील यांनी केले.या वर्षी आपण अहिराणी दिनदर्शीका प्रकाशनाची सुरुवात छत्रपती संभाजी नगर येथे केल्या बद्दल श्री.विनायकराव पवार यांनी कौतुक केले तर भाषा व खान्देशच्या सर्व उपक्रमांना या परीसरात वाढवण्यासाठी आम्ही मदत करु असे आश्वासन आण्णासाहेब गायके यांनी दिले.प्रा.दौलतराव सोनवणे यांनी खुमासदार सुत्रसंचलन केले.श्री. विनायकराव पवार सर व त्यांच्या संपुर्ण टीमने खूप कमी वेळात शाॅर्ट बट स्वीट कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल अध्यक्ष विकास पाटील यांनी मनापासून हार्दिक अभिनंदन केले व जागतिक अहिरानी परिषद व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे उपस्थितांना अवाहन केले.या प्रसंगी श्री कैलास पाटील,श्री सनेर ,श्री.भैय्यासाहेब पाटील व विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment