साहित्य अकादमी वर अहिराणी चा डंका

साहित्य अकादमी’च्या महोत्सवात ‘अहिराणी’चा डंका

डॉ. एस. के. पाटील यांचा बहुभाषिक सोहळ्यात सहभाग

साहित्य अकादमी वर अहिराणी चा डंका 2

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील प्रसिद्ध अहिराणी साहित्यिक, दुसऱ्या जागतिक अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांना अखिल भारतीय साहित्य अकादमीने पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते.

प्रसिद्ध कवी, गीतकार लेखक, दिग्दर्शक गुलजार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचावर देशभरातील विविध प्रादेशिक भाषांतील साहित्यिक एच. आर. बाडो, डॉ. एस. के. पाटील, कोन्चो गायस्टो, बुधोसिंग, हिरा मीना, सुधा अजयसिह चौव्हाण, अनिसा तडवी, सुदर्शन वैसिस्ठा, शामीम शर्मा आदी मंचावर उपस्थित होते. या वेळी देशभरातील वेगवेगळ्या प्रादेशिक बोली भाषा, आदिवासी बोली यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लेखक व कवींचे वेगवेगळ्या सत्रांत सादरीकरण झाले.

साहित्य अकादमी मंचावर अहिराणी कविता सादर

विश्व अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या अहिराणी डॉ. पाटील यांनी अहिराणी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. साहित्य अकादमी दिल्ली यांनी जागतिक स्तरावर प्रादेशिक भाषा संमेलन आयोजित केले. १७ देशातील १७५ भाषांचा परिचय झाला. अहिराणी भाषेतील लेखन, अहिराणी भाषेचा प्रांत या भागातील मुख्य पिके, कष्टकरी जनता सातत्याने असलेल्या दुष्काळाची दाहकता जगभरातील दीड कोटी लोक अहिराणी बोलतात हा अनुभव व अहिराणी संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांचा उहापोह आपल्या भाषणात केला.

साहित्य अकादमी वर अहिराणी चा डंका 6

साहित्य अकादमी महोत्सवात सूत्रसंचालन

कृष्णा किंबहुने यांनी सूत्रसंचालन केले.

साहित्य अकादमी वर अहिराणी चा डंका 8

डॉ. एस. के. पाटील यांचे मनोगत

दिल्ली: येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीच्या जागतिक संमेलनात देशभरातील विविध प्रादेशिक भाषांतील साहित्यिकांसह दाभाडीचे अहिराणी साहित्यिक डॉ. एस. के. पाटील.

”खरं तर जगभरात मोठ्या प्रमाणात अहिराणी बोली बोलली जाते”
अहिराणी भाषेतील साहित्यिक म्हणून साहित्य अकादमीच्या महोत्सवात सहभागी होता आले, हा आनंद खूप मोठा आहे. हा तमाम ‘कसमादे’- खानदेश व अहिराणी भाषिकांचा गौरव आहे. अहिराणी बोलीसाठी पुढे या.

डॉ. एस. के. पाटील, संमेलनाध्यक्ष, दुसरे विश्व अहिराणी साहित्य संमेलन

साहित्य अकादमी वर अहिराणी चा डंका 10

Leave a Comment