गिरड गावातील तरुणी अंजली कोळी ‘बीएसएफ’मध्ये भरती

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी ‘बीएसएफ’मध्ये भरती

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी ‘बीएसएफ’मध्ये भरती, ग्रामस्थांकडून गौरव

अंजली कोळीचा प्राचार्य व ग्रामस्थांकडून सत्कार

गिरड (ता. भडगाव), ता. २१ – गिरड येथील रहिवासी आणि जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अंजली कोळी ही नुकतीच सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती झाली आहे. तिच्या या यशाबद्दल गावात आनंद व्यक्त केला जात असून, प्राचार्य आणि ग्रामस्थांनी तिचा सन्मान केला.

प्राचार्यांनी दिला शाल व पुष्पगुच्छ

जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अंजली कोळीचा सत्कार केला. यावेळी नितीन पाटील, सचिन बोरसे, रमेश धनगर आणि सचिन कोळी यांसह मान्यवर उपस्थित होते.

कष्टकरी कुटुंबाची मुलगी गावाची शान

अंजलीचे आई-वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. त्यांच्या कष्टाचे फळ अंजलीने आपल्या यशाने गोड केले आहे. गिरड गावातील पहिली महिला बीएसएफ सैनिक होण्याचा मान अंजलीने मिळवला आहे.

संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक

अंजलीच्या या यशाबद्दल कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, उपाध्यक्षा डॉ. पूनम पाटील, सचिव प्रशांतराव पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी तिचे कौतुक केले. ग्रामस्थांनीही अंजलीच्या यशाचे जोरदार स्वागत केले आहे.