अहिराणी भाषासंवर्धन परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर

अहिराणी भाषासंवर्धन परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर

महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन
महाकवी कालिदास  रिमझिम काव्य संमेलन 

(प्रतिनिधी ):- उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दरवर्षी अहिराणी भाषेचे संवर्धन करणाऱ्या अहिराणीतील साहित्यिक, लेखक, कवी, स्तंभलेखक, विविध डिजिटल प्रणालीतील मान्यवर यांना दरवर्षी भाषेच्या सक्षमीकरण समृद्धी व संपन्नतेच्या कार्यासाठी जीवनगौरव व डॉ.दा.गो.बोरसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.


 सन २०२४ चा जीवनगौरव पुरस्कार


अमळनेर येथील ज्येष्ठ अहिरानी साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कामगारांच्या कविता, अहिराणी लोकसहित्य दर्शन खंड १, २, ३, चिरा हार्दिक राधेच्या नजरेतून प्रेमाचे आश्वासन देणारा काव्यासंग्रहाचे निर्माते  कृष्णा पाटील यांना जाहीर झाला आहे.


 डॉ.दा.गो. बोरसे गौरव पुरस्कार

१) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या आदर्श शिक्षिका तसेच अहिरानी म्हणी संग्रह व बागलानी ओव्याचा देखणा नजाराणा या अहिरानी साहित्य लेखिका सौ. लता पवार (नासिक),

२) वर्तमानपत्रातून अहिराणीचे लेखन, खुड मिरचीन पानी, अरकर बरकर, एस्टीच्या गोष्टी  या अहिरानी पुस्तकांचे लेखन, उत्कृष्ट लेखक, समाजसेवक  एम.के.भामरे (शिरपूर )


३)  जळगाव, धुळे आकाशवाणी वर भाषण, संवाद लेखन, कथालेखन, अहिरानी व मराठीतून सतरा पुस्तके प्रकाशीत, धुळे येथील अहिरानी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व भारत परिक्रमा करणारे   प्रा.भगवान पाटील(बहाद्दरपूर)


४) निर्मल ग्राम प्रतिनिधी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, खान्देश ना खजिना, महारष्ट्रातील पंधरा बोलीभाषा समाविष्ट करीत ‘ इये मायबोलीचे नगरी ‘,अहिराणीत माऊलींचा हरिपाठ, अहिराणीत भगवदगीता जशी शे तशी या सारखे अहिरानी साहित्य व अनेक अहिरानी काव्यसंग्रह तसेच बालगीते व बडबड गीतांच्या लेखिका श्रीमती वनमाला पाटील(जालना )


५) अहिराणीच्या संवर्धनासाठी खान्देश वाहिनीची निर्मिती, प्रथम अहिरानी वेबसाईट निर्मिती, प्रथम विविध खान्देशी बोली वेबसाईट निर्मिती, जवळपास पाच हजार अहिरानी आणि विविध खान्देशी बोली लेखपट वेबसाईट अप्लिकेशन  वर प्रकाशित, व अहिरानी चित्रपट निर्माते श्री   समाधान सोनवणे( ताडे, अमळनेर)


६) अहिरानी तडका या अहिरानी भाषेतील यु ट्यूब चॅनेल ची निर्मिती करून अहिरानी भाषेतील विनोदी संवाद यात ग्रामीण भागातील किस्से, शेतकरी व्यथा, शिक्षक आणि विद्यार्थी, सुरत भुसावळ रेल्वे यावर अनेक व्हीडिओ प्रसारित करून खान्देशांतच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात स्थायिक झालेल्या खान्देशी लोकांना भुरळ घालणारे उपक्रमशील शिक्षक श्री  रोहित पवार (कमखेडा ता.शिंदखेडा)

यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे वितरण रविवार दि.३० जून रोजी नाशिक येथील कालिका मंदिर हॉल जुना आग्रा रोड येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

तरी; अहिराणी रसिक, प्रेक्षक , साहित्यिक व भाषा प्रेमी यांनी या सोहळ्यास व रिमझिम अहिराणी काव्य संमेलनास उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे, असे आवाहन अध्यक्ष विकास पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील सहकार्याध्यक्ष डॉक्टर एस के पाटील यांनी केले आहे.

पुरस्कार सोहळा अध्यक्ष

या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. फुला बागुल शिरपूर हे राहणार असून आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस डॉ. ॲड.नितीन ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेचे सचिव प्रमोद कुवर यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर
अहिराणी भाषासंवर्धन परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर