बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न

बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न

बायको मन्ही बहुगुणी: अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे यशस्वी

निर्मिती व सादरीकरण
खान्देशी राजा ग्रुप आणि वंजारी खपाट प्रस्तुत, “बायको मन्ही बहुगुणी” या बहुचर्चित अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग नुकतेच एरंडोल येथे शंकर आप्पा नगर आणि गांधीपुरा येथे यशस्वीरित्या पार पडले.



कलावंत मंडळी
ही वेबसीरीज प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच एक ठळक सामाजिक संदेशही देणार आहे. यामध्ये विठ्ठल चौधरी, नैना परदेशी, रावसाहेब वाघ, भय्या मरसाळे, अजय राजपूत, तेजस कल्याणी, दीपक मोरे, आणि यश कल्याणी या कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने कथेला न्याय दिला आहे.

अहिराणी वेबसीरीजचे
बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न

निर्माता आणी सह-दिग्दर्शन
प्राध्यापक दीपक अशोक चौधरी यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाखाली ही वेबसीरीज तयार करण्यात आली आहे. निर्मितीमध्ये समस्त खान्देशी कलावंतांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

दिग्दर्शक विठ्ठल चौधरी दादा

लेखक गडबड अहिरे पोलीस पाटील खपाट

विशेष सहकार्य दिग्दर्शक अरुण जाधव एरंडोल



शूटिंगसाठी विशेष लोकेशन
गावातील पारंपरिक वातावरणात, शंकर आप्पा नगर आणि गांधीपुरा येथे या वेबसीरीजचे शुटिंग झाले. ही ठिकाणे खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली आहेत.

प्रेरणा आणि पुनश्च सुरुवात
खान्देशी राजा ग्रुप यापूर्वीही दर्जेदार अहिराणी वेबसीरीज आणि गाणी तयार करत होता. मात्र, कोरोना महामारी आणि कै. अशोक चौधरी सर, कै. नवल माळी, व कै. नाना माळी यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्मिती थांबली होती.

आता गडबड अहिरे, अरुण जाधव, प्राध्यापक दीपक चौधरी, विठ्ठल चौधरी यांच्या पुढाकाराने “खान्देशी राजा” यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा दर्जेदार वेबसीरीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

अहिराणी वेबसीरी
अभिनेते अजय राजपुत

प्रेक्षकांसाठी खास आवाहन
“बायको मन्ही बहुगुणी” ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. प्राध्यापक दीपक चौधरी यांनी प्रेक्षकांना भरपूर प्रेम देऊन कलावंत आणि निर्मात्यांचे प्रोत्साहन करण्याचे आवाहन केले आहे.