भाजपा नेते आणी भाजप मधील खान्देशी नेते
भाजप आणि भाजप मधील खान्देशी नेते. भाग दुसरा
पहिल्या भागात आपण पाहिलं कीं, प महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेसचं अर्चस्व होतं. पण मुंबई कोकणाचं कांय? कोकणात बॅरिस्टर नाथ पै आणि मधू दंडवते यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्ष जोरात होते. रायगड मध्ये शेकापनें चांगला जम बसवीला होता तर, महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसलां टक्कर देऊ शकेल असा शेकाप तयार होतं होता. भविष्यात शेकाप काँग्रेसलां वरचड ठरू शकेल असं चित्र दिसत होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण अस्वस्थ झाले होते.
त्यांनी त्या पक्षातील, यशवंतराव मोहिते, शंकराव मोहिते पाटील, शरद पवार यां सारख्या अनेक शेकाप पक्षातील नेत्यांना काँग्रेस मध्ये घेतले आणि शेकाप लंगडी करून टाकली. पण धुळ्यात मात्र झुलाल भिलाजी पाटील शेकापला घट्ट धरून बसले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणालां बळी नं पडता शेकाप टिकवून ठेवला. पण जनतेचीं मात्र झेड बी नानाना साथ मिळाली नाही.
मुंबई मध्ये काँग्रेस आणि कम्युनीस्ट एकमेकांसी चांगली टक्कर घेत होते. त्याचं वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी शिवसेना आकार घेत होती. गिरणगावात कम्युनिष्टांचे निर्विवाद वर्चस्व होतं. तिथं कृष्णा देसाई या कम्युनिष्ट नेत्यानी चांगला जम बसवीला होता. त्यांना हरवण काँग्रेसलां शक्य होतं नव्हत.
त्याकाळात कामगार नेता म्हणून श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट नेतृत्व करत होते. डांगे त्या काळात कामगार नेते म्हणून मुंबईचे अनभिषीक्त सम्राट होते. मुंबई बंद करणे हा डांगेचा डाव्या हाताचा खेळ होता. या श्रीपाद डांगेचे गिरणगावातील आमदार कृष्णा देसाई यांचा खून झाला. त्याचा आरोप शिवसेनेवर आला. बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नावं लोक घेऊ लागले. बाळासाहेब ठाकरे हे त्यात दोषी आढळून आले नसले तरी या खून खटल्यात, दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे यां तीन शिव सैनिकांना दोषी धरून त्यांना प्रत्येकालां 14/14 वर्षाची तुरुंग वासाची शिक्षा ठोटावंण्यात आली होती.
कॉम कृष्णा देसाई यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई यांचा पराभाव करून शिव सेनेचे वामनराव महाडिक निवडून आले. त्यांच्या रूपाने शिव सेनेचा पहिलां आमदार विधानसभेत गेला. इथून शिव सेनेची वाढ सुरु झाली. कोकण पूर्वी समाज वाद्याचा गड होता तो पूर्ण शिवसेनेच्या ताब्यात आला. मुंबईवर बी शिव सेनेने ताबा मिळवीला तो आज तागायत कायम आहे. सुरवातीला शिवसेना मराठी माणूस हां मुद्दा घेऊन काँग्रेस सोबत राहिली.
इंदिरा गांधी यांच्या आणीबानीला बाळासाहेबांनी पाठिंबाही दिला होता. पण नंतर मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीच्या जागी हिंदुत्वचा मुद्दा घेऊन काँग्रेस सोडून भाजपसी युती केली ती बाळासाहेब ठाकरे हयात असे पर्यंत कायम होती. त्यातून त्यांनी मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे असे तीन मुख्यमंत्री बनविले.
महाराष्ट्र हे राजकारण सुरु असताना त्याचा प्रभाव खान्देशवर पडत नव्हता. खान्देशनें आपली वेगळी वाट तयार केली होती. मुंबई राज्य असताना त्यात विदर्भ मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्र, गुजराथ आणि उत्तर कर्णाटकं यांचा त्यात समावेश होता.
त्यात मराठी आमदारांचे नेते खान्देशचे भाऊसाहेब हिरे होते. गुजराथी आमदारांचे नेते मोरारजीं देसाई होते, तर निजलिंगाप्पा कानडी आमदारांचे नेते होते. अर्थातचं सभागृहात वर्चस्व मराठी आमदारांचे म्हणजे त्यांचे नेते भाऊसाहेब हिरे यांचे होते.
स्वातंत्र्य पूर्व काळात काँग्रेस पक्षात दोन गट होते. डॉ राजेंद्र प्रसाद विरुद्ध नेहरू गट. दोन्ही गटात वितुष्ट होतं. राज्यात भाऊसाहेब हिरे हे डॉ राजेंद्र प्रसाद गटाचे नेते होते तर मोरारजीं देसाई हे पं नेहरू गटाचे होते. नंतर डॉ राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती झाले. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून बाद झाले. त्यांचा गट उघडा पडला. नेहरूनी आणि मोरारजीं यांनी त्यांची येथेच्छ शिकार केली. त्यात भाऊसाहेब हिरे राजकारनातून संपले. त्यांच्या जागी मोरारजी देसाई यांनी यशवंतराव चव्हाणना आणले आणि इथेचं खांदेशच्या हातातून मुख्यमंत्री पद निसटले. तो आज तागायत खान्देशलां मुख्यमंत्री पद मिळाले नाही.
दुसरीकडे जनसंघ हळू हळू कासवं गतीने पुढे सरकत होता. त्या पक्षाच्या नेतृत्वस्थानी उत्तमरावनाना पाटील यांच्या रूपाने जनसंघाच्या नेतृत्वस्थानी खान्देशच होता. गांधी हत्येनंतर आरएसएस आणि जनसंघावर या खुनाचे आरोप झाले. विशेषतः ब्राह्मण जातीला लक्ष करून त्यांच्यावर हल्ले झाले. हां प्रकार खान्देशांत कुठे झाला नाही. पण महाराष्ट्रात त्याचे खूप पडसाद उमटले. राज्यात काँग्रेसचीं मोठी हवा तयार झाली होती. लोक जनसंघ वाल्याना गावांत शिरू देत नव्हते.
त्यांना दगड शेण मारत होते. अशा काळात उत्तमराव पाटील यांनी जनसंघ पक्षाचं नेतृत्व हातात घेतल. गावागावात जाऊन पक्ष पोहचवीला. सुरवातीच्या काळात खान्देश प्रदेश मुंबई पदवीधर मतदार संघात होता. नाना या पदवीधर संघातून विधानपरिषदेवर निवडून यायचे. त्या काळात काँग्रेस पक्ष पदवीधर आणि शिक्षक संघाच्या निवडणुकीत क्वचित उतरत असे. सर्वत्र जनसंघ आणि समाजवादी यांच्यातच लढती व्हायच्या.
नाना मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडून आले आणि विधानपरिषदनें त्यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड केली. त्यांच्याच काळात विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाला. नानां पेशाने वकील होते. त्यांचा अभ्यासही चांगला होता. म्हणून त्यांना व्याख्यांनालां लोक बोलवत असत.
या बाबतीत माझी एक गोड आठवण आहे. त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात ढोबळ मानानें तीन गट होते. पहिला गट सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा, दुसरा गट डाव्यांचा त्यात कम्युनिष्ट, समाजवादी, शेकाप वगैरे आणि तिसरा गट उजव्या विचार सरणीचा पक्ष म्हणजे जनसंघ होता. तीनही गटात तीव्र मतभेद होते. तीनही गट तीन टोकावर होते.
ई सं 1970-71 च्या काळात मी एसपीडीएम महाविद्यालयात शिकत होतो. या संस्थेचे मालक व्यंकटराव आण्णा धोबी होते. ते काँग्रेस पक्षाचे. ते दोन वेळा शिरपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार होते. या महाविद्यालयाचे प्राचार्य गो हूं महाजन. ते अत्यंत विद्वान होते. त्यांचा इतिहास विषय होता. त्यांच इतिहासाच पुस्तकं अभ्यासक्रमालाही होते. ते कट्टर कम्युनिष्ट होते. ते त्या काळात, सोवियत कम्युनिष्ट सरकारच्या निमंत्रणावरून रशियालां भेटून आले होते.
आणि उत्तमराव नाना पाटील हे विधानपरिषद विरोध पक्ष नेते, हिंदुत्ववादी जनसंघ पक्षाचे. वैचारीक दृष्ट्या तिघे तीन टोकावर. या महाविद्यालयात आम्हा विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाव म्हणून महाजन सर राज्यातील मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्यान ठेवीत असत. त्यातील एक दिवस नानानच व्याख्यान प्राचार्य साहेबानी ठेवलं. इथे नोंद घेण्यासारखी गोष्ट जाणवली ती वैचारिक कितीही मतभेद असले तरी एकमेकांच्या ज्ञानाचा आदर करावा, ही शिकवण आम्हाला यातून मिळाली. अतिशय उत्तम व्याख्यान झालं.
पहिल्या भागात तुम्हाला सांगितलंच आहे कीं, 1957 मध्ये संपूर्ण भारत देशातून जनसंघांचे फक्त दोनच खासदार निवडून आले होते. त्यात उत्तरप्रदेशातून अटल बिहारी वाजपेयी आणि महाराष्ट्रातून उत्तमराव पाटील. अटलबिहारी वाजपेयी उत्तमराव नाना पेक्षा तीन वर्षानी लहांनं होते. त्यामुळे ते नानांचा खूप आदर करीत. धुळ्यात आले म्हणजे वाजपेयीजीं नाना कडेच मुक्कामाला असायचे.
आणीबाणी नंतर 1977 लां ज्या निवडनुका झाल्या त्यात लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी सर्वं विरोधी पक्षांना एकत्र करून जनता पार्टी हां नवा पक्ष तयार केला त्यात जनसंघ ही विलीन झाला. त्यांनी कम्युनिष्ट पक्ष आणि शेकाप सारखे प्रादेशिक पक्ष घेऊन आघाडी तयार केली आणि त्यात इंदिरा काँग्रेसचा दारूण पराभव झाला. इंदिराबाईंच्या मोठमोठ्या नेत्यांचं पानिपत झालं. स्वतः इंदिरा गान्धी आणि पुत्र संजय गांधी पराभूत झाले.
यां निवडणुकीत धुळेकर मतदार अत्यंत विचित्र वागले. त्यांनी नानाचा पराभाव करून नवख्या विजय नवल पाटील यांना निवडून दिलं. या निवडणुकी पूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकित पराभूत झालेले विजय नवल पाटील धुळ्याचे खासदार झाले.
उत्तमराव पाटील मूळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे. पण त्यांचं प्रेम धुळ्यावर जास्त होते. धुळ्यानेही त्यांच्यावर खूप प्रेम केले होते. 1957 साली जेंव्हा नेहरू आणि काँग्रेस फर्मात होती तेंव्हा धुळ्यानी त्यांना निवडून दिल. पण मोक्याच्या काळात धुळेकरानी त्यांचा पराभव केला. त्यावेळी ते निवडून आले असतें तर धुळे जिल्ह्याला एक बलवान कॅबिनेट मंत्री मिळाला असता. पण धुळ्याच्या नशिबात तो योग नव्हता हेच खरं. नानाच्या या पराभवा बद्दल बोलताना अटल बिहारी कळवळून बोलले होते. “माझा उजवा हात आज निखळून पडला.”
बाकी बघू या पुढच्या भागात.
क्रमशः
1 thought on “भाजपा नेते आणी भाजप मधील खान्देशी नेते”