चाळीसगाव शहर पोलीस विभागातर्फे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा: १६०० विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

चाळीसगाव, दि. ४:
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव शहर पोलीस विभागाच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी जवळपास १६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कलात्मकता सादर केली.

या उपक्रमाचे मार्गदर्शन अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल साहेब, आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी साहेब यांनी केले.
कार्यक्रमातील मान्यवर उपस्थिती:
ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, वाहतूक शाखेचे सहा पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, तसेच पोलीस विभागातील पंढरीनाथ पवार आणि भटू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेची वैशिष्ट्ये:
विद्यार्थ्यांनी आनंदी आणि उत्साही वातावरणात स्पर्धेत भाग घेतला. शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली. शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात येणार असून, यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी साहेब यांनी सांगितले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन:
या उपक्रमात आ.बं. मुलांचे हायस्कुलचे कलाशिक्षक चेतन कुऱ्हाडे आणि चित्रकार दिनेश चव्हाण यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.

अधिकाऱ्यांचे समाधान:
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि स्पर्धेला मिळालेला भव्य प्रतिसाद पाहून अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले.
अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थी आणि पोलीस विभाग यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल.