आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न

चाळीसगाव 1

कोणते अँप कसे वापरावे, पिनकोड कसा असावा, मोबाईल वापरतांना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अगदी सर्वांना समजेल अशी माहिती त्यांनी स्क्रीनद्वारे दाखवून शिक्षकांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तरे दिली. तंत्रज्ञानाचा होत असलेला दुरूपयोग व त्यातून होणारे नुकसान, हॅकर हॅक कसे करतात,,या बाबत महिलांनी कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती दिली.

दोन तासांच्या या शिबिरात अतिशय मोलाचे मार्गदर्शन रामकृष्ण मिशन संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या सहकार्याने श्री. अजय निकुंभ यांनी केले. यावेळी विद्यालयाचे चेअरमन श्री, योगेशभाऊ अग्रवाल, मुलींच्या शाळेचे चेअरमन ऍड. श्री, प्रदीपनाना अहिरराव, संचालक श्री, जितेंद्रभाऊ वाणी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री, बाबा सोनवणे सर, उपमुख्याध्यापिका सौ, एस, पी, पाटील मॅडम, पर्यवेक्षक श्री, शरद जाधव सर , शिक्षक प्रतिनिधी श्री, मनोहर सूर्यवंशी,श्री, रमेशजी जानराव सर,श्री, यु, डी, मराठे, श्री, हेमंत साळी, श्री, दिलीप चित्ते, श्री, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी आ.बं. मुलांचे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आभार उपमुख्याध्यापक श्री, मिलिंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व आ.बं. परिवाराचे सहकार्य लाभले.

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न 3

Leave a Comment