खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार!


          Dk ऊर्फ दिनेश चव्हाण यांना चित्र कारितेचा या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. Dk अभिनंदन!
        दादासाहेब फाळके हा देश पातळीवर दिला जाणारा पुरस्कार खूप प्रत्येष्ठचा आणि मानाचा पुरस्कार आहे. तो dk नी पटकावला याचा मनस्वी आनंद झाला.
          खांदेशात कलेच्या प्रांतात अनेक कलाकार आहेत. पण पुरस्काराचा राजमार्ग त्यांना माहित नाही किंवा तिथं पर्यंत त्यांना पोहचविनारा कोणी गॉड फादर नसतो. म्हणून अनेक खान्देशी कलाकर अंधारातच कोमेजून जातात. जगाला त्यांची ओळख सुद्धा होतं नाही.
         खूप कमी कलाकार नशिबाने प्रकाशात येतात. त्यातील गोंदूर धुळे येथील राम सुतार हे जगातील उत्तम शिल्पकार आहेत. त्यांनी असंख्य पुतळे घडविले आहेत त्यातील एक म्हणजे सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्या रामसुतार यांना पद्मविभुषण हां राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
          दुसरा कलाकर 40 तालुक्यातील शिवाजी लोटन पाटील. हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना त्यांच्या धग यां चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रपतीचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.  या धग चित्रपटाला लंडन येथे भरलेल्या जागतिक चित्रपट प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मिळाली होती.
        आता काल दिनेश चव्हाण यांना त्यांच्या चित्रकला नैपूण्यासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मुंबईत सहारा स्टार तर्फे, चित्रपट तारे तारकाच्या झगमगाटात अत्यंत देखण्या सोहळ्यांत हां कार्यक्रम रंगातदार स्वरूपात पार पडलेल्या या सोहळा बघून खूप आनंद झाला.
         Dk हे एक सिद्धहस्त चित्रकार आहेत. त्यांच्या अनेक चित्रकृती मी पाहिल्या आहेत. नुकत्याच अंमळनेर येथे पार पडलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात dk यांच्या चित्रकलेचा मोठा प्रभाव जाणवला. त्यांनी मराठीतील सर्वं दिग्ज साहित्यिकांची पोस्टर तयार करून त्यांच्या माहितीसह ती सुरेख रंगाविलेली चित्र सर्वत्र नाट्यगृहात लावली होती. त्यांच्या या कामागिरी बद्दल संमेलन अध्यक्ष मां रवींद्र शोभणे यांच्या हस्ते dk चा सत्कारही केला. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अशा या हर हुन्नरी चित्रकाराची योग्य निवड झाली. त्या बद्दल dk चं पुन्हा एकदा अभिनंदन!
         हे राम सुतार, शिवाजी लोटन पाटील, दिनेश चव्हाण हे खान्देश बाहेर जन्मले असतें तर तिथल्या लोकांनी त्यांचं खूप कौतुक केलं असत. पुढऱ्यांनी मोठे समारंभ घेऊन यांचा नागरी सत्कार केले असतें. पण खान्देशच्या कलाकारांच्या नशिबी असलं काही नसत. इथे कोणाला अस्मिता स्वाभिमानच नाही तर कार्यक्रम भरविणार कोण?
बापू हटकर

खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड

आयोध्यातील राम रघुवंशीची मूर्ती धुळे गोंदूर येथील राम सुतार घडविणार