धुळे पाणी टंचाई धुळ्यात पाणी बाणी

धुळ्यात पाणी बाणी धुळे पाणी टंचाई

मार्च महिना सुरु आहे. म्हणजे हिवाळा अजून संपला नाही. होळी नंतर हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरु होतो अशी आपल्याकडे परिस्थिती असतें. एप्रिल मे आणि जूनचा पहिला पाऊस पडे पर्यंत आपल्याकडे कडक उन्हाळा असतो. तो यायच्या आधीच धुळे शहर आणि जिल्ह्यात पाणीबाणी सुरु होऊन पाणी टंचाइचे चटके नागरिकांना लागयला सुरवात झाली आहे.

धुळे हिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठेही फेरफटका मारा लहान लहान शाळकरी मुलं मुली, तरुण स्त्रिया, प्रौढ, वृद्ध महिला हातात कळशा हांडे घेऊन पाण्यासाठी दाही दिशा पायपीट करत फिरताना तुम्हाला दिसतील. नदी, नाले, ओहळ कोरडे पडले आहेत.

त्यांच्या मधे कुठे तरी शेवड्या खणून या माता भगिनीं वाटी वा ग्लासाने घोट घोट पाणी उपसत हंडा भरताना दिसतात. कुठे ओस पडलेल्या दूषित पाण्याच्या विहिरीतून बादलीने पाणी शेंदुन महिला आपल्या कळषा, हांडे भरताना दिसतात. हे पाणी अत्यंत घाण, दूषित आणि आरोग्याला हानी कारक असत. तरी नाईलाज म्हणून  लोकाना हेच पाणी प्याव लागतं आहे.

खान्देशचीं अवस्था अशी झाली आहे कीं


प्यास जोरकी लगी थी लेकिन पानी मे जहर मिला था!
पिते तो भी मर जाते नां पिते तो भी मर जाते!


पानी पीओ या ना पीओ जब मौत आना तय हैं तो, बेहतर यही हैं प्यासा मरने के बजाय जहरीला पानी पी के मरनां अच्छा हैं. कमसे कम प्यासे तो नही मरेंगे. हे आयुष्य खान्देशी माणसाच्या नशिबी आलं आहे.दूषित पाण्यातून  डायरिया, कावीळ वगैरे सारखे दुर्धर रोग होऊन त्यात निष्पाप लोकांचे बळी जाऊ शकतात. सरकारणे हे थांबवल पाहिजे.

गढूळ पाणी वापरणे मजबूरी

पाण्याचे टँकरही अजून कुठे सुरु झाल्याचे जाणवत नव्हते. धुळे तालुक्यातील विंचूर गावात आवाज सम्राटचा प्रतिनिधी गेला होता. त्यांनी अनेक माता भगिनीचीं भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ग्रामस्थ भल्या पहाटे, हांडे, कळशा, बादल्या घेऊन विहिरी जवळ घोळका करून उभे होते. विहिरीत डोकावून पाहिले तर त्यात अत्यंत गढूळ पाणी दिसत होते.त्याचं पाण्यावर यांची गुजराण सुरु आहे आणि डोक्यावर अजून संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. त्यातील रेखा नावाच्या महिलेने तिच्या सहित सर्व गावाकाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. विहिरीतील दूषित घाणेरडे पाणी दाखवत रेखा म्हणाली, हे असं गढूळ पाणी आहे ते आम्ही कसे प्यायचं ते सांगा.

धुळे पाणी टंचाई
धुळे पाणी टंचाई धुळ्यात पाणी बाणी

तर खान्देशच वाळवंट होईल

अशा प्रकारे संपूर्ण जिल्हा पाण्या वाचून होरपळत असताना लोकप्रतिधीनां मात्र याच कोणतही सोयर सुतक जाणवत नाही. ते सर्वं लोकांसभेच्या निवडणूकीच्या धामधुमित मशगुल दिसत आहेत. कुठून कोण उमेदवार उभा राहील, कोणाचे तिकीट कापले, कोणाला तिकीट मिळाले या चर्चाना उधान आले आहे. यातच ते रमले आहेत.विंचूर गावाची कथा ही सर्वं जिल्ह्याची व्यथा आहे. जिल्हा कायम दुष्काळाच्या छायेत वावरत असताना त्यावर कायमं स्वरूपी तोडगा निघावा आस कोणालाच वाटत नाही.  पाण्यासाठी नां जनता रस्त्यात लढत नां नेते सभागृहात लढत. मग पाणी मिळेल कैसे?

सुरगाना तालुक्यात केमचा डोंगर आहे, जिथून गिरणा निदीचा उगम होतो. त्या डोंगरावर ईतरही 20 नद्या उगम पावतात. त्या सर्वं पश्चिम वाहिन्या आहेत. ते सर्वं पाणी अरबी समुद्रात वाहून जातं. त्या सर्वं नद्या पूर्व वाहिण्या करून ते पाणी खांदेशात उतरवील पाहिजे. त्यातून गिरणा, मोसम, बोरी, पांझरा या नद्या बारमाही केल्या तर आपला पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल.

राष्ट्रीय जल लवादाने या केमच्या डोंगरावरचे खूप पाणी आपल्या वाट्यालां दिलं होतं. त्यातील बरंच पाणी महाराष्ट्र सरकारनें गुजराथला देऊन टाकले. खान्देशलां फसवून 65 tmc पाणी गोदावरी खोऱ्यात नेलं. नर्मदेत आपलं 36 tmc पाणी होतं त्यातील 22 tmc पाणी गुजराथलां देऊन टाकले.

आता फक्त 14 tmc पाणी शिल्लक आहे, तेही सरकार अडवत नाही. तापी नदीत आपलं 191 tmc पाणी आहे ते सुद्धा सरकार अडवत नाही. अजून असं बरंच पाणी आपलं शिल्लक आहे. ते अडवील जातं नाही. सरकार ते का अडवत नाही हे एक मोठं रहस्य आहे.

आता त्यावर गुजरात, मराठवाडा, मुंबईचा डोळा आहे. तुम्ही झोपून राहिलात तर आहे तेही पाणी पळवून नेतील आणि खान्देशचं कायम स्वरूपी वाळवंट होईल. म्हणून पाण्यासाठी लढा आणि हक्काचं पाणी घेऊन कायमचा दुष्काळ मिटवा.

बापू हटकर

खान्देशच्या विकासाच क्रीम आहें उत्तर महाराष्ट्र वाळवंटातील ओऍशिस उत जळगाव क्रीम आटु देऊ नका

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचालित उत्तर महाराष्ट्र जल परीषद आयोजित जल सप्ताह व जलसंवाद


 

2 thoughts on “धुळे पाणी टंचाई धुळ्यात पाणी बाणी”

Leave a Comment