९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिनेश चव्हाण यांचा यथोचित सत्कार

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिनेश चव्हाण यांचा यथोचित सत्कार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2024

अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमालनातील कविकट्टा या सभागृहात जवळजवळ सव्वीस कवी, लेखक व साहित्यिक यांच्या प्रतिमा व त्यांच्या जीवनातील महत्वाच्या माहितीसह सचित्र चितारुन भिंतीवर लावून सभागृहाला आगळेळेगळे स्वरुप देणारे चाळीसगाव येथील ए. बी. बंकट विद्यालयातील चित्रकलाशिक्षक मा. दिनेश चव्हाण यांचा संयोजन समितीच्या वतिने मा. राजन लाखे आणि ईतर मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी भरभरुन कौतुक केले.

आदरणीय राजन लाखे सरांनी कालपासून या संयोजन समितीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कवीसंमालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळून देशभरातून आलेल्या व आपल्या विविध विषयावरील वैविध्यपूर्ण कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली व या संमेलनात रंगत आणल्याबद्दल आदरणीय राजन लाखे सरांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले व हा कविकट्टा नावारुपाला आणण्यासाठी सक्रीय सहकार्य करणा-यांचा सत्कार करुन सन्मानित केले.

1 thought on “९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिनेश चव्हाण यांचा यथोचित सत्कार”

Leave a Comment