अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

मुंबई – अहिराणी भाषेच्या संशोधनात मौलिक योगदान देणारे खान्देशचे सुपुत्र डॉ. रमेश सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा-अभ्यासक पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे हा सन्मान सोहळा पार पडला.

या पुरस्कारांतर्गत दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात आले.

अहिराणी भाषेसाठी अमूल्य योगदान

डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीत संशोधन करून ‘अहिराणी शब्दकोश’, ‘अहिराणी म्हणी आणि वाक्प्रचार’, ‘खान्देशातील कृषी जीवन’ यांसारखी महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अहिराणी भाषेचा अभ्यास व्यापक झाला आहे.

अहिराणी ओवी-कोश’, ‘अहिराणी ओवीगीतांचा चिकित्सक अभ्यास’ आणि ‘खान्देशातील अहिराणी बोलीतील लोकसाहित्य’ ही त्यांची तीन संशोधनात्मक पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.

डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

गेल्या ३४ वर्षांचा साहित्य व सामाजिक योगदानाचा गौरव

शिंदाड, ता. पाचोरा (जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. सूर्यवंशी यांनी ३४ वर्षे कन्नड (जि. औरंगाबाद) येथील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे.

२०१२ पासून त्यांनी ‘आदिवासी ठाकर डॉट कॉम’ ही वेबसाइट सुरू केली असून, १९८६ पासून आदिवासी ठाकर समाजाच्या उन्नतीसाठी ते कार्यरत आहेत.

या सन्मानामुळे अहिराणी भाषा आणि खान्देशी संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संशोधकांना नवी प्रेरणा मिळेल, असे मत साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे.