डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार

डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

वेरुळ, जि.छत्रपती संभाजीनगर:- (डॉ.यशवंत पवार ) स्वराज्य संकल्पक राजे शहाजी महाराज भोसले यांची 430 वी जयंती  वेरुळ ,तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी नगर , येथील मालोजीराजे गढीवर मोठ्या साजरी करण्यात आली.

या वेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करनार्यांचा सत्कार करण्यात आला, त्यात कन्नड येथिल जेष्ट प्रतिभावंत लेखक डॉ रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार
डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार

हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मुधोजी राजे भोसले (नागपूर संस्थान) , प्रमुख पाहुणे शिवाजी राजे जाधव (वंशज लखोजी राजे जाधव सिंदखेडराजा), शहाजीराजे उत्सव समिती चे अध्यक्ष डॉ रविंद्र बनसोड , जयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देउन करण्यात आला.

मराठा आरक्षण बाबत निजाम गँजेट सह महत्त्वाची तांत्रिक माहिती त्यांनी दिली,सोबतच आदिवासी, भिल्ल, ठाकर या समाजाचा अभ्यास करून त्यांना न्याय मिळवून दिला.अहिराणी भाषेचा अभ्यास करून अनेक पुस्तकांचे प्रकाशन देखील केले, या बद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.


कार्यक्रमास विलास पांगारकर (कार्याध्यक्ष),शशिकांत शिरसाठ(सरचिटणीस) यांचे सह कन्नड तालुक्यातून विजय भोसले,अभिषेक देशमुख, प्रा. एस.के. पाटील, डॉ. मुकुंद सोमवंशी, संतोष पवार,डॉ यशवंत पवार यांचे सह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी हजर होते.

1 thought on “डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार”

Leave a Comment